शासकीय आश्रम शाळा दुधड येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम आकर्षित पद्धतीने पार पडला..
नांदेड :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत येणारी शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे शैक्षणिक सत्र २०२४-२५ प्रवेशोत्सव कार्यक्रम घेऊन शाळेला सुरुवात झाली. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास प्रत्यक्षात दि.१५.०६.२०२२४ रोजी प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ व आस्था निर्माण व्हावी यासाठी शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने करण्यात आले. या पार्श्वभुमीवर सत्र २०२४-२५ मध्ये इयत्ता १ली ते १२वी मधील सर्व विद्यार्थ्याचे प्रवेशोस्तवाच्या प्रसंगी स्वागत फुल, शालेय साहित्य व गोड भोजन देऊन आकर्षित पद्धतीने करण्यात आले या प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले श्रीराम राठोड (किनवट प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी अधिकारी) नरेश दामले (आदिवासी विकास विभाग अमरावती विभाग प्रतिनिधी अधिकारी) कार्यक्रमचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद चामे सर, सरपंच उपसरपंच सर्व शिक्षक स्टाफ व मान्यवराणी विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी या हेतूने अमूल्य मार्गदर्शन केले आणि टी. आर अडबलवार सरांनी कार्यक्रमाचे शुत्रसंचालनाची धुरा सांभाळली.
प्रतिनिधी,शंकर बरडे नांदेड