अंबाजोगाईतील ब्रह्माकुमारीज आनंदसरोवर येथे दोन दिवसीय शिबीर संपन्न
ब्रह्माकुमार दशरथ भाई यांचे मौलिक मार्गदर्शन ; गीता पाठशाळेच्या सदस्यांची उपस्थिती
अंबाजोगाई (वार्ताहर)
शहरातील ब्रह्माकुमारीज आनंदसरोवर, अंबाजोगाई ओम शांती सेंटर येथे नुकतेच दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विघ्न विनाशक स्थिती कशी बनविता येईल यासाठी ज्वाला स्वरूप भट्टी संपन्न झाली. ब्रह्माकुमार दशरथ भाईजी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी गीता पाठशाळेच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या शिबिराचे उद्घाटन ब्रह्माकुमार दशरथ भाई (पुणे), न्यायदंडाधिकारी सचिन मेहता, बीके गोपाळ रांदड, सेंटरच्या प्रमुख बीके सुनिता बहेन, बीके मंजू बहेन व इतर प्रमुखांच्या शुभ हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. बीके सुनिता बहेन यांनी बीके दशरथ भाई यांचे स्वागत केले. तसेच त्यांचा परिचय ही करून दिला. या शिबिरात पहिल्या दिवशी योगधारणा करण्यात आली. यामध्ये एकूण २५० जणांनी सहभाग घेतला. त्यानंतर ‘मन स्वच्छ बुद्धि क्लिअर रख, डबल लाईट स्थिती का अनुभव करो’ या विषयावर बीके दशरथ भाई यांनी दोन तास मौलिक विचार मांडले. त्यांनी उपस्थितांना चिंतन, मनन, ज्ञान, योग तसेच सेवाभाव यांचे जीवनातील महत्व पटवून दिले. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे विकार आणि वाईट विचारांपासून दुर रहा असे सांगितले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी २० ते ५० वर्षे वयोगटातील पती-पत्नी व इतर अशा एकूण ३०० जणांनी सहभाग घेतला. ‘अध्यात्मिक शक्ती द्वारा स्वस्थ एवम सुखी परिवार कसा करावा’ या विषयावर बीके दशरथ भाई यांनी अनमोल विचार मांडले. त्यांनी उपस्थितांना आयुष्यात संकुचित विचार करू नये, कुटुंबात एकमेकांचा आदर करा असा मौलिक संदेश दिला. दोन दिवसीय कार्यक्रमास परिसरातील आडस, केज, कळंब, परळी, रेणापूर, बर्दापूर, हातोला, तळेगाव, घाटनांदुर, आंदोरा, बनसारोळा, ममदापूर पाटोदा, आपेगाव, चनई, मोरेवाडी या गावातील गीतापठण शाळेचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ईश्वरीय प्रार्थनेने झाली. बीके मंजू बहेन यांनी सर्व सहभागी व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बीके मंजू बहेन, बीके प्रिया बहेन, गोपिका बहेन, बीके महादू भाई, बीके शिल्पा बहेन, बीके मधू बहेन, बीके पंक्ती बहेन व इतर माता भाई यांनी सहकार्य केले.