युवा उत्कृष्ट पत्रकार म्हणून विशाल जोशी तर अपघात गृहस्थांना रुग्णवाहिकेद्वारे मदत कार्य करनारे सागर शेजवळ यांना सन्मानित.
गंगापूर तालुक्यातील न्यूज टुडे 24 चे तालुका प्रतिनिधी विशाल जोशी यांना युवा उत्कृष्ट व त्यांच्या लेखणीची दखल घेऊन यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर गंगापूर तालुक्यामध्ये अपघात गृहस्थांना रुग्णवाहिकेद्वारे वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देणारे सागर शेजवळ यांना देखील स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम सुपर माहाराष्ट्र न्यूज अँड एंटरटेनमेंट चँनलच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम वाळूज एमआयडीसी येथील एका हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी कॅप्टन रुचिका जैन इंडियन पँरा फोर्स इंडियन आर्मी झांसी, सचिन इंगोले ट्राफिक पोलीस निरीक्षक वाळूज, राजेंद्र साहने पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वाळूज, अक्षदा पासलकर अभिनेत्री, विदुला बाविस्कर अभिनेत्री यांसह राजकीय, सामाजिक, पोलीस,पत्रकारिता व कलाकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
(न्यूजटूडे 24 गंगापूर छत्रपती संभाजीनगर)