चल रं सर्जा चल र राजा … मंद्रूप येथे बैलगाडीतून मिरवणूक काढून बालगोपाळांचे स्वागत…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मंद्रूप (इंदिरानगर) येथे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात नव्या उमेदीने करण्यात आली. नवागतांचे बालकांचे स्वागत बैलगाडीतून हलगीच्या ठेक्यावर मिरवणूक काढून करण्यात आले. आगळ्या वेगळ्या पध्दतीने केलेल्या स्वागताने चिमुकले भारावून गेले होते. मनमौजित धुंद असणारी नवं बालके इतक्या आनंदात भारावून गेले चिमुकल्या डोळ्यात एक आशावाद दिसत होता. संपत आलेल्या सुट्ट्यामुळे मनात होणारी तगमग ,पुन्हा जुन्या मित्रांना भेटण्यासाठी उत्सुकता, आतुरता ,नवीन दप्तर पाठ्यपुस्तकांची रेलचेल, ओसुंडून वाहणारा आनंद यावेळी दिसून आला. आपली मुले शाळेत पाठवा,, झाली झाली शाळा सुरू झाली ,,अशा प्रकारच्या घोषणा देत. बैलगाडीतून मुलांनी इंदिरानगर मधून प्रवेशोत्सवाचे उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली. सकाळी शाळेमध्ये रांगोळी काढून फुलांच्या पाकळ्या अंथरुण,, फुगे ,,तोरण ,,झुरमळ्या,,अशा प्रकारे सजावट करून नवागत मुलांचे गुलाबाचे फुल देऊन
मंद्रूप इंदिरानगर ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे, रेहाना शेख , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पल्लवी डोगे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय मरीआईवाले ,
मुख्याध्यापक यशवंत कांबळे, केंद्रप्रमुख कलप्पा हेळवी यांच्या शुभहस्ते मुलांचे औक्षण करण्यात आले .उपस्थित पालकांमधून मुलांचे स्वागत करण्यात आले .नवागत मुलांचे स्वागत करून सर्व मुलांना पाठयपुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले तर
विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला. आली यावेळी शिक्षिका उमा कोळी मॅडम, सुवर्णा घाटगे, कल्पना कसबे, शबाना शेख व इंदिरा नगर वरील सर्व पालक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी शिवराज मुगळे सोलापूर)