कर्जत एमआयडीसीकरिता औद्योगिक महामंडळाचे रुपरेखा सर्व्हेक्षण पथक कोंभळीत दाखल
_ प्रस्तावित क्षेत्राचे चार दिवसांत होणार सर्व्हेक्षण पूर्ण
कर्जत एमआयडीसीसंदर्भात आलेल्या रुपरेखा सर्व्हेक्षण पथकाचे कोंभळी येथील ग्रामस्थांकडून गाजत वाजत स्वागत करण्यात आले.
बहुचर्चित कर्जत एमआयडीसीचा प्रश्न कर्जत जामखेड मतदारसंघासह राज्यभरात चर्चेला जात असून या बहुचर्चित एमआयडीसीबाबत पावसाळी अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने याची दखल घेत राज्य सरकारकडून आदेशित केल्याने एमआयडीसीसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या रुपरेखा सर्व्हेक्षणासाठी कोंभळी येथे रूपरेखा सर्व्हेक्षण पथक आज बुधवार दि.३ जुलै रोजी दाखल झाले. या औद्योगिक विकास महामंडळाच्या सर्व्हेक्षण पथकाचे येथील ग्रामस्थांच्या वतीने गाजत वाजत स्वागत करण्यात आले आहे. या पथकामध्ये एमआयडीसी भूमापक एस के राठोड, प्रमुख भूमापक एस.डी. खैर, सर्वेअर वासुदेव गावडे यांचा समावेश आहे.
या पथकाकडून एमआयडीसीसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्राची चार दिवस पाहणी करून सर्व्हेक्षण पूर्ण केले जाणार आहे. एमआयडीसीसाठी कर्जत तालुक्यातील कोंभळी, थेरगाव, रवळगाव या भागात ४८१.९८ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रस्तावित क्षेत्राची चार दिवसांमध्ये सर्व्हेक्षण करून त्याचा अहवाल लवकरच मिळाल्यानंतर सर्व्हेक्षणाचा महत्त्वाचा टप्पा झाल्याने भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे. असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
यावेळी कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, थेरगावचे सरपंच मिनिनाथ शिंदे, चंद्रकांत महारनवर, आण्णा महारनवर, नागमठाणचे सरपंच देविदास महारनवर, विठ्ठल नन्नवरे, मोहन खेडकर, तात्या खेडकर, कुंडलिक गांगर्डे, मारूती उदमले, सुनिल खंडागळे, सुनिल यादव, रामभाऊ शिंदे, भाऊसाहेब गावडे, वैभव गांगर्डे, अतुल गांगर्डे, अमोल गांगर्डे, भाऊसाहेब गांगर्डे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जत तालुक्यातील कोंभळी, थेरगाव, रवळगाव या भागात एमआयडीसीसाठी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आल्याने या औद्योगिक वसाहतीला १५ मार्च रोजी उच्चाधिकार समितीकडून तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
सर्वेक्षण पथकाकडून आज ३ जूलै रोजी प्रस्तावित जागेची पाहणी केली जात असताना एमआयडीसी संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांच्यासह नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या..
प्रतिनिधी महंमद पठाण सह नयुम पठाण कर्जत