लाख रायाजी येथील दुर्दैवी घटना : विद्युत शॉक लागून तरुणाचा मृत्यू.
दिग्रस तालुक्यातील लाख रायाजी येथील एका २३ वर्षीय तरुणांची विद्युत मोटार पंपाच्या केबलचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.३ जुलै २०२४ ला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
गोपाल नाना तायडे (वय -२३) रा.लाख रायाजी असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या घरी बांधकाम सुरू असल्याने आज दुपारी १ वाजताच्या सुमारास स्लॅबवर विद्युत मोटार पंपाने पाणी मारत असतांना अचानक मोटार पंपाच्या उघड्या केबलला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला जबर विद्युत शॉक लागल्याने तो जमिनीवर पडला. तेव्हा उपस्थितांनी त्याला उपचारासाठी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात सुरेश ढाले, ओमप्रकाश नाटकर व अनिल गाडे करीत आहे.