मिरजगाव येथे श्री.क्षेत्र गंगापूर पायी दिंडी पालखीचे स्वागत
_ तनपुरे उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपहाराची सोय..
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे मे.तनपूरे पेट्रोलियम, तनपुरे उद्योग समूहाच्या वतीने श्री.क्षेत्र गंगापूर येथील श्री.विठ्ठल आश्रम पायी दिंडी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी तनपुरे कुटूंबियांच्या वतीने पालखीचे स्वागत करून आरती करण्यात आली. तर पायी दिंडी पालखी सोहळ्याचे ह.भ.प. गातामुर्ती रामभाऊ राऊत महाराज यांच्या शुभहस्ते तनपुरे कुटूंबियांना मानाचा नारळ देण्यात आला. यावेळी हभप राऊत महाराज यांचा तनपुरे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री.क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना उद्योजक विलास तनपुरे कुटूंबियांच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
यावेळी मारूतराव तनपुरे, उद्योजक विलास तनपुरे, सौ.मिनाक्षी विलास तनपुरे, विकास तनपुरे सर, सौ.विनिता विकास तनपुरे, रविंद्र तनपुरे, सौ.ऋतुजा रविंद्र तनपुरे, उद्योजक रावसाहेब खिळे, गंगाधर बोरूडे, हभप राजेंद्र गोरे महाराज, अभंग बोरूडे, सलिम आतार, रामचंद्र निंबोरे, सागर पवळ, संभाजी बोरूडे, बंडू राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री.क्षेत्र गंगापूर येथील विठ्ठल आश्रम पायी दिंडी पालखीतील वारकऱ्यांना मिरजगावच्या तनपुरे उद्योग समूहाच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून अखंडीतपणे अल्पोपहाराची सोय करण्यात येत आहे. अल्पोपहार नंतर मिरजगाव येथून पायी दिंडी सोहळ्याचे श्री.क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
प्रतिनिधी महंमद पठाण सह नयुम पठाण कर्जत