डॉक्टर्स डे निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
अंबाजोगाई -: ” डॉक्टर्स डे ” च्या निमित्ताने आय एम ए आंबेजोगाई, ॲम्पा, लॅब असोशियन, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व
भुतडा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाईत विविध प्रकारच्या सामाजीक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये सांस्कृतीक समितीच्या अध्यक्षपदी अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ राजेश इंगोले यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचा संघटनेच्या वतीने सहृदय सत्कार करण्यात आला. तसेच सांस्कृतीक समितीच्या मध्यवर्ती कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल डॉ योगेश मुळे, डॉ प्रज्ञा किनगावकर व डॉ विजय लाड यांचाही सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कल्याण काळे सचिव धनराज सोळंकी व तर रोट्रॅक्ट च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऋषभ कर्णावट यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वैभव गायके या विद्यार्थ्याने वैद्यकीय प्रवेश परीक्षा पास होऊन नेत्रदीपक यश मिळवल्याबद्दल त्यास आय एम ए तर्फे शैक्षणीक साहित्य देण्यात आले. यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे, डॉ राजेश इंगोले, डॉ अनिल भुतडा,, डॉ अरुणा केंद्रे, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ३१ रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले. डॉक्टर्स डे निमित्त लोखंडी सावरगाव येथील उमेन्स हॉस्पिटलला वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ राजेश इंगोले यांनी इंडीयन मेडिकल असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतीक समितीचा अध्यक्ष म्हणून निवड हा समस्त अंबाजोगाईकरांचा सन्मान आहे आणि या वाटचालीत आय एम ए अंबाजोगाईच्या स्थानिक शाखेचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे या शब्दात आपली कृतज्ञता व्यक्त केली. मिळालेल्या प्रत्येक पदाचा संघटनेच्या आणि डॉक्टर्सच्या हितासाठी उपयोग करून देईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थिततांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ नवनाथ घुगे तर आभार प्रदर्शन डॉ अरुणा केंद्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी रोटरी चे अध्यक्ष कल्याण काळे, सचिव धनराज सोलंकी, उपाध्यक्ष अजित देशमुख, स्वप्नील परदेशी, गणेश राऊत, प्रा. रोहिणी पाठक, डॉ अतुल शिंदे, संतोष मोहिते, विवेक गंगणे सर, अनंत कर्णावट, डॉ निलेश तोष्णीवाल, डॉ श्रीनिवास रेड्डी ,डॉ बळीराम मुंडे, डॉ जुबेर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.