लातूर येथे CSC सेंटर चालकांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
दर महिन्याला मोबदला निश्चित करावा
काल लातुर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील VLE व CSC सेंटर चालकांनी जिल्हाधिकारी यांना एक दिवसीय बंद पुकारुन काही मागण्यांसाठी निवेदन सादर केले.तसेच जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ, रेणापूर औसा,आदी ठिकाणी ही निवेदन सादर केले गेले.
VLE व संगणक परिचालक यांच्या संयुक्त संघटने कडून लातूर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले मागील वर्षीच्या व चालु वर्षांच्या येत असलेल्या अडचणी आणि सद्यस्थितीत चालू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात CSC,VLE येणा-या अडचणी होत असलेला दबाव तसेच पिक विमा योजनेत एक रुपयात पिक विमा भरला पाहिजे अशा प्रकारच्या अडचणी त्यांच्या समोर मांडले.पिक विमा साईट खुप स्लो चालत आहे ही बाब त्यांना सांगण्यात आली.शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतो व शासन आम्हाला डावलून नविन शासन निर्णय काढून CSC धारकांनी ते काम फुकट करून द्यावे असे सांगत आहे या निर्णयामुळे आम्हावर उपासमारीची वेळ येईल . आम्हाला योग्य ते कमिशन निश्चित करा.प्रत्येक महिन्याला VLE खात्यावर जमा करावे.किंवा दरमहा 20 हजार रुपये मानधन कायम निश्चित करावे शासनाच्या विविध योजना मोफत दिल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून देण्यात यावा.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन करण्यासाठी निश्चित मोबदला ठरवावा अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.त्यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी व CSC सेंटर चालक उपस्थित होते.