न्यूज टुडे 24 दणका! जि. प.शाळा उखळवाडी येथील शिक्षकांची बदली.
हिमायतनगर तालुक्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या ग्रामपंचायत दुधड-वाळकेवाडी अंतर्गत येणारी जिल्हा परिषद शाळा उखळवाडी येथे शिक्षक शाळेच्या वेळेत अनुउपस्थित राहून शाळेला बंद कुलूप दिसले होते त्या संदर्भात मागील दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांच्या तक्रारी नुसार ही बाब न्यूज टुडे 24 च्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली व प्रशासनाने बातमीची तात्काळ दाख्खल घेऊन गटशिक्षण अधिकारी यांनी संबंधित केंद्र प्रमुख गणेश कोकूलवार यांना चौकशीचे आदेश दिले त्या अनुषंगाने आज दि ९ जुलै रोजी शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ याच्या समक्ष केंद्र प्रमुख गणेश कोकुलवार यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांच्या समस्यास प्राधान्य देऊन जि.प. शाळा उखळवाडी येथील मुख्याध्यापक सातलवार यांची डेपोटेशनवर बदली करण्यात आली…
यावेळी उपस्थित, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिवाजी ढोले, अशोक भुसारे, पोलीस पाटील प्रमेश्वर बुरकूल, मारोती धुमाळे, नेमाजी धुमाळे, आशिष धुमाळे, यशवंत गोरे, ज्ञानेश्वर बेले,तुकाराम बेले, बालाजी नाईक व ग्रामस्थ उखळवाडी.
(शंकर बरडे नांदेड )