Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी घेतले चिंतामणीचे दर्शन
    Maharashtra

    मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी घेतले चिंतामणीचे दर्शन

    newstoday24By newstoday24July 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी घेतले चिंतामणीचे दर्शन

    यवतमाळ, दि.९ (जिमाका) : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी कळंब येथे श्री चिंतामणी मंदीर देवस्थानला भेट दिली व चिंतामणीचे दर्शन घेतले. मंदीराच्या गाभाऱ्यात त्यांनी पुजा व आरती केली. मुख्यमंत्र्यांचे मंदीर देवस्थान येथे आगमण झाल्यानंतर संस्थानच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गाभाऱ्यात जावून चिंतामणीचे दर्शन घेतले तसेच पुजा व प्रार्थना केली. संस्थानच्यावतीने त्यांचा संस्थानच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. श्री चिंतामणी सर्वांचे मंगल करतील, सर्वांवर कृपादृष्टी करतील, असे ते यावेळी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले. यावेळी आ.डॉ.अशोक उईके, विवेकजी महाराज, संस्थानचे माजी अध्यक्ष चंदुभाऊ चांदोरे, सचिव बसवेश्वर माहुलकर, विश्वस्त शाम केवटे, चंद्रकांत गोसटवार, रमन बोबडे, शैलेश साठे, त्र्यंबक वाके आदी उपस्थित होते.

    पं.दीनदयाल प्रबोधिनीला भेट मुख्यमंत्री डॅा.मोहन यादव यांनी यवतमाळ शहरानजीक असलेल्या पंडित दीनदयाल प्रबोधिनीला भेट दिली. याठिकाणी त्यांनी पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. संस्थेच्या कार्याची चित्रफित त्यांना यावेळी दाखविण्यात आली. यावेळी आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

    मुख्यमंत्र्यांचे आगमणप्रसंगी विमानतळावर स्वागत मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांचे जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमण झाल्यानंतर आ.मदन येरावार, आ.डॉ.अशोक उईके, राळेगावचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleन्यूज टुडे 24 दणका! जि. प.शाळा उखळवाडी येथील शिक्षकांची बदली.
    Next Article जातीअंत संघर्ष समिती आक्रमक ; आसाम व तामिळनाडू मधील अल्पसंख्यांकांच्या हत्येचा केला निषेध
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.