पी.एम भगवान विश्वकर्मा याजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा या साठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
परभणी: पी.एम भगवान विश्वकर्मा योजना अंतर्गत 12 बलुतेदार व 18 अलूतेदार या समाजातील समाज बांधवांनी परभणी जिल्यातील विविध प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेतले. लाभार्थीना प्रशिक्षण कालावधीतील निधी मिळाला परंतु, प्रशिक्षण घेतल्यावर या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी साहित्य किट खरीदी करण्यासाठी 15000 हजार रुपये किंवा साहित्य देण्यात येणार होते. परंत प्रशिक्षण पूर्ण होऊनही 5 महिने कालावधी झाला अजूनही साहित्य देण्यात आले नाही. तसेच QR कोड देण्यात आला होतो त्याचा कालावधी 6 महिन्याचा आहे तो ही संपत आला आहे अजून त्यावर कुठलीच कार्यवाही झालेली नाही. तसेच 1लाख रु या योजने अंतर्गत बँकेचे लोन देण्यात येणार होते,पण प्रशिक्षणार्थी यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता बँकेत त्यांना सांगण्यात आले की असा शासनाचा कुठलाही जी आर आम्हाला आला नाही. त्या मुळे हे प्रशिक्षण घेऊनही लाभार्थी या योजने पासून वंचित राहिले आहे असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे, तरी लवकरात लवकर प्रशिक्षणार्थी यांना लाभ देण्यात यावा असे निवेदन भाजपा परभणी मंडळ अध्यक्ष भालचंद्र गोरे, दिनकर पांचाळ गंगाप्रसाद मोरे बळीराम गरुड दीपक वाकीकर माणिकराव पांचाळ संजय हनवते बालाजी पांचाळ विष्णू पांचाळ यांच्या वतीने देण्यात आले.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी