10 वर्षा पूर्वी सेवेतून बडतर्फ केलेले पो कॉ शेषेराव वागतकर यांना सेवेत हजर करून घेण्याचे मॅटचे आदेश
ऍड ओमप्रकाश माने यांचे सर्वत्र अभिनंदन.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
तत्कालीन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणा वरून 10 वर्षा पूर्वी सेवेतून बडतर्फ केलेले पो कॉ शेषेराव वागतकर यांना प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) ने परत सेवेत हजर करून घेण्याचे आदेश दिले असून
सेवा निवृत्त पोलीस उपअधीक्षक ऍड ओमप्रकाश माने यांनी चालवलेल्या या खटल्यामुळे पो कॉ वागतकर यांना जो न्याय मिळाला त्या बद्दल ओमप्रकाश माने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या विषयी सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल शेषेराव लक्ष्मण वागतकर ( ब न 1848 ) यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणा वरून साधारण 10 वर्षा पूर्वी म्हणजे सन 2015 साली तत्कालीन पोलीस अधिक्षक श्री नवीनचंद्र रेड्डी यांनी नोकरीतून बडतर्फ केले होते. या बडतर्फीच्या आदेशा विरुद्ध वागतकर यांनी आय. जी, डी जी, गृहसचिव व गृहमंत्री (महाराष्ट्र राज्य यांच्या कडे अपील केले होते मात्र या सर्वांनी त्यांचे अपील फेटाळले.
अखेर शेवटचा पर्याय म्हणून वागतकर यांनी सेवा निवृत्त पोलिस उपअधिक्षक ऍड ओमप्रकाश माने यांच्या मार्फत
प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) औरंगाबाद येथे केस न 637/2023 नुसार प्रकारण दाखल केले. या प्रकरणी चाललेल्या खटल्यात मा. मॅटने वागतकर यांना दिलेली शिक्षा ही कसूराच्या प्रमाणात नसून शिक्षा अवाजवी आहे या निर्णया प्रती येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी बडतर्फीची दिलेली शिक्षा रद्द करून त्यांना कर्तव्यावर हजर करून घ्यावे व अन्य सौम्य स्वरुपाची शिक्षा द्यावी असे आदेश दिले.
दरम्यान ऍड ओमप्रकाश माने (मो 9226342548) यांनी पो कॉ वागतकर यांना जो न्याय मिळवून दिला त्या बद्दल माने यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.