सनगाव चे सुपुत्र व देगलूरचे प्रसिद्ध डॅा.विनायक मुंडे यांना मातृशोक
शनिवारी सनगाव येथे गंगा पुजन कार्यक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यांतील सनगाव ही जन्मभूमी व देगलूर ही कर्मभूमी असलेले प्रसिद्ध डॅा.विनायक चंद्रसेन मुंडे यांच्या मातोश्री श्रीमती ठकाबाई चंद्रसेन मुंडे यांचे दि.३० /०६/२०२४ रविवार रोजी वृध्दापकाळाने ८५ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले डॅा.विनायक,श्री.विश्वास व मुलगी सौ.मंगलताई राजेंद्र जाधवर तसेच उच्च शिक्षित सून डॅा.सौ.मुक्ता,सौ.मीरा व उच्च पदस्थ नातू आय.पी.एस. सोमय मुंडे,जावई डॅा.राजेंद्र जाधवर,ईतर नातू व पंतू असा मोठा परिवार आहे.
त्यांचा गंगा पुजन कार्यक्रम शनिवार दि.१३/०७/२०२४ रोजी सनगाव येथे होणार असून त्या निमित्त ह.भ.प.प्रा.ईश्वर मुंडे महाराज ( गांजपूरकर ) यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत किर्तन होईल. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मुंडे कुटुंबियांनी केली आहे.
सनगाव चे सुपुत्र व देगलूरचे प्रसिद्ध डॅा.विनायक मुंडे यांना मातृशोक
Related Posts
Add A Comment