Crime Report । बेकरी हल्ला प्रकरणाला महिना होत आला पण याचा तपास कुठपर्यंत लागला ?
अद्याप फरार असलेल्या कुणाल खंडेलवाल सह इतर तीन आरोपींचा कधी शोध लागणार ?
आरोपी शोधण्यात तोफखाना पोलीस जाणूनबुजून तर टाळाटाळ करत नाही ना ?
फरार आरोपींना नेमकं कोण आश्रय आणि पाठबळ देतंय ?
अहमदनगर शहरात दहशत निर्माण करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकणार ?
सबळ पुरावे पोलिसांकडे असतानाही कुणाल भंडारीला कलम ३०७ च्या गुन्ह्यात का वर्ग करत नाही ?
‘त्या’ बेकरीतील निष्पाप कामगारांना कधी न्याय मिळणार ? हे पाहणे महत्वाचे….
अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात गेल्या एक दीड वर्षांत दोन गटात वाद , हाणामाऱ्या आणि जीवे ठार मारण्याच्या हेतूने जीवघेणे हल्ले अशा अनेक गंभीर घटना रोजचा घडत आहे पण हे प्रकार पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याने घटना वाढत गेल्या.. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अहमदनगर शहरात अशांतता निर्माण होण्याच्या घटना वाढत चालल्यात, मुळात अशा घटनांतील गुन्हेगारांवर, समाज कंटकांवर कडक कठोर कारवाई होत नाही, त्यामुळेच शहर आणि जिल्ह्यात गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची संख्या वाढतच चालली, हे प्रकार रोखण्यात नेमकं कोण कमी पडत आहे हा एक प्रश्न आहे.
शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी गंभीर गुन्ह्याच्या घटना घडतात त्या नंतर पोलीस घटना ठिकाणचे cctv फुटेज देखील तपासतात त्यातून आरोपी मारेकरी निष्पन्न देखील होतात, पण विषय असा येतो की, अनेकदा या घटनेतील आरोपी किंवा मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचतच नाहीत त्यामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढत जाते आणि सुरुवातीला एखादा छोटासा गुन्हा केलेला गुन्हेगार समाज कंटक मोठं मोठे गुन्हे करण्यास न घाबरता पुढे सरसावतो आणि परिसरात शहरात असे हे गुन्हेगार टोळीटोळीने एकत्र येत दहशत माजवत गंभीर गुन्हे घडवून आणतात.त्यातीलच एक प्रकार म्हणजे १८ जून रोजी अहमदनगर शहरात घडलेले अनेक गंभीर गुन्हे… यात धार्मिक स्थळांवर दगडफेक , धार्मिक घोषणाबाजी तसेच बेकरीत झोपलेल्या कामगारांवरील जीवघेणा हल्ला… अशा अनेक घटना एकाच दिवशी घडल्या असून या प्रकरणी आरोपींवर गुन्हा देखील दाखल झाला तसेच यातील बेकरी हल्ला प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४ आरोपीना अटक करत ते पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले होते, तर या घटनेतील उर्वरित आरोपी कुणाल खंडेलवाल सह इतर तीन आरोपी अद्याप फरार आहे, यांचा तपास लावण्यात तोफखाना पोलिसांना अपयश आले आहे, त्यामुळे तोफखाना पोलीस नेमकं काय काम करत आहे तसेच हे आरोपी शोधण्यात तोफखाना पोलीस जाणूनबुजून तर टाळाटाळ करत नाही ना ? की तोफखाना पोलीस या घटनाच गांभीयाने घेत नाहीत ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर एकाच दिवशी घडलेल्या या विविध घटनांमागचा खरा मास्टर माईंड असलेला बजरंग दलाचा पदाधिकारी कुणाल भंडारी देखील पोलिसांच्या हाती लागला नाही, कुणाल भंडारी आहे तरी कुठे ? त्याचा पोलिसांना शोध का लागत नाही ? तोफखाना पोलिसांना कोणाचा दवाब आहे का ? १८ जून रोजी घडलेल्या या गंभीर घटनांना आता एक महिना होत आला पण याचा पोलिसांना अद्याप छडा लावता आला नाही, नेमकं पाणी कुठं मुरतंय ? नगर शहरात एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक करणारे गुन्हे घडवून अहमदनगर शहरात दहशत निर्माण करणारी टोळी अर्थात आरोपी कुणाल भंडारी, तसेच कुणाल खंडेलवाल आणि त्यांचे इतर सहकारी आरोपी यांना कोण आश्रय देतंय ? त्यांना कोणाचे पाठबळ मिळत आहे, १८ जून या दिवशी घडलेल्या घटनेचे cctv फुटेज देखील पोलिसांना उपलब्ध झाले आहे तसेच यात बजरंग दलाचा दलाचा कुणाल भंडारी हा मुख्य सूत्रधार असल्याबाबतचे सबळ पुरावे पोलिसांना प्राप्त झाले असताना देखील पोलीस त्याला कलम ३०७ च्या गुन्ह्यात का वर्ग करत नाही ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
तर एकीकडे अहमदनगर शहरात १८ जून रोजी एकाच दिवशी एका जमावाने मोठी दहशत माजवत विविध गंभीर गुन्हे घडवून आणले याबाबत आ.अबू आझमी यांनी विधानसभेत आवाज उठवत शहरातील गुन्हेगारीबाबत लक्ष वेधले. आणि आरोपींवर दाखल गुन्ह्यात कलम वाढीची मागणी देखील केली होती, त्याचे पुढे काय झाले ? तसेच या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याबाबत तोफखाना पोलिसांकडून अद्याप काही माहिती देखील मिळाली नाही, तरी आता या प्रकरणाचा कधी पूर्ण तपास लागतो ? यातील आरोपी कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात आणि कधी त्या बेकरीतील निष्पाप कामगारांना न्याय मिळतो हे पाहणे महत्वाचे आहे…