Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»राळेगाव येथे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात दरोडा आरोपींना काही तासातच अटक
    Maharashtra

    राळेगाव येथे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात दरोडा आरोपींना काही तासातच अटक

    newstoday24By newstoday24July 13, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राळेगाव येथे महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात दरोडा आरोपींना काही तासातच अटक.

    राळेगाव शहरातील अनुपचंद जयप्रकाश वर्मा या सराफा व्यावसायिकाचे राळेगाव सराफा लाईन मध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स नावाने दुकान आहे.तीन चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून दुकान फोडून दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने ८ लाख ९४ हजार ३५० रुपयाची चोरी करून मालवाहू वाहनाने पळून गेल्याची घटना दि ११ जुलै रोजी पहाटे ६ च्या उघडकीस आली. सदर याप्रकरणी फिर्यादी अनुपचंद जयप्रकाश वर्मा यांनी राळेगाव पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा तात्काळ उघडकिस आणण्याचे आदेश दिले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकांनी तात्काळ घटनास्थळ काढून घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलीस ठाणे राळेगाव येथील अधिकारी अमलदार यांचे मदतीने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीचे आधारे आरोपी नाजिम उर्फ बाबू खान असलम खान वय 22 वर्ष समीर खान हसन खान वय 27 वर्ष दोन्ही राहणार मोहसिन लेआउट डोरली रोड यवतमाळ सोहेल शहा शफिक शहा वय 22 वर्ष आदर्श नगर पांढरकवडा रोड यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्य पूरक विचारपूस केली असता नमूद आरोपी त्यांनी सदरचा गुन्ह्याची कबुली दिली.व आरोपीकडून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीचे चार चाकी मालवाहू वाहन क्रमांक एम एच 29 बी इ 1860 किंमत अंदाजे तीन लाख रुपये व एक मोटर सायकल क्रमांक एम एच 29 बी इ 7686 किंमत अंदाजे 90 हजार 3 मोबाईल किंमत अंदाजे 30 हजार गॅस कटर व सिलेंडर किंमत अंदाजे सहा हजार तसेच गुन्ह्यात चोरी केलेले सोन्या चांदीचे संपूर्ण दागिने किंमत सात लाख 40 हजार 350 असा एकूण 11 लाख 66 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून उर्वरित मुद्देमाल हस्तगत करणे करता पोलीस स्टेशन राळेगाव यांचे कडून तपास सुरू आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आधारसिंह सोनवणे,पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल मुडे, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके,पोलिस अंमलदार योगेश डगवार,सुधीर पीदुरकर सुधीर पांडे,निलेश निमकर,उल्हास कुरकुटे,रजनीकांत मडावी,बबलू चव्हाण सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर अमित झेंडेकर मिथुन जाधव तसेच पोलीस स्टेशन राळेगाव येथील पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे,पोलीस अंमलदार गोपाल मास्टर,सुरज चिवाने यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहेत.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticleCrime Report । बेकरी हल्ला प्रकरणाला महिना होत आला पण याचा तपास कुठपर्यंत लागला ?
    Next Article रोहित ढवारे याने वाढदिवसानिमित मानव विकास मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.