रोहित ढवारे याने वाढदिवसानिमित मानव विकास मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप.
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- जोधप्रसादजी मोदी विद्यालयाचा माजी विद्यार्थी रोहित ढवारे याने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त मानव विकास मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी ,आदित्य गोविंदवाड , शरद राठोड,रोहन जाधव,प्रमोद जाधव,ओमकार कासारे हे उपस्थित होते.
याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी फोटोग्राफर रोहित ढवारे याचे वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन केले. आजकालचा युवक हा सामाजिक भान विसरून गैरमार्गाचा अवलंब करतांना दिसून येत आहे. मात्र त्यांला रोहित हा अपवाद ठरला असल्याचे राजकिशोर मोदी यांनी याप्रसंगी सांगितले. आजच्या युवकांत केस वाढविणे, व्यसनाच्या आहारी जाणे, थोरामोठ्यांचा अनादर करणे याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत आहे. मात्र अशाही परिस्थितीत रोहित ढवारे व त्याचे सहकारी हे समाजाभिमुख काम करत असल्याबद्दल राजकिशोर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
रोहित याने श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्याच जोधाप्रसादजी मोदी विद्यालयात आपले शिक्षण घेतले आहे . आपणास याच शैक्षणिक संस्थेने घडविले आहे तेव्हा आपण ही आपल्या परीने येथील विद्यार्थ्यांसाठी कोठेतरी खारीचा वाटा उचलला पाहिजे याच सामाजिक भावनेने इतर अनाठायी खर्च टाळून याच संस्थेच्या मानव विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा मानस करत साहित्याचे वाटप केले. याच कार्याचा आदर्श समाजातील इतरही युवक घेऊन समाजात आपले नाव उज्वल करतील अशी अपेक्षा याप्रसंगी मोदी यांनी व्यक्त केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित ढवारे याचे सहकारी सत्यम भन्साळी, सूरज साळवे , निलेश साळवे , युवराज लखेरा , साखरे जगदीश, सौरभ पांचाळ , ऋषिकेश कडबाने , दीपक जाधव, वैभव पांचाळ, मयूर शेळके यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास मानव विकास विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.