पोखरी गावात घाणीचे साम्राज्य ,नागरिकांचे आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
अंबाजोगाई प्रतिनिधी : अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी गावात गल्लो गल्लीत घाणीचे साम्राज्य झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .ग्रामपंचायत कार्यालयाकडून उपाय योजना होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत .गावातील त्वरित घाण काढावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे .सध्या सर्वत्र पावसाळ्याचे दिवस असून गावातील नालीच्या पाण्याचे व्यवस्थापन नसल्याने रस्त्यावर पाणी साचून घाणीचे सा म्राज्य निर्माण झाले आहे रस्त्यावर पाणी साचत असल्याने ढासाने अणि दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे ग्रामपंचायत कार्यालयाचे दुर्लक्ष करीत असल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .ग्रामस्थ वेळोवेळी मागणी करू नये गावकऱ्यांच्या मागणीकडे ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करीत आहे .गावातील सरपंच ग्रामसेवक गावातील सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे .गावात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास त्याला जिम्मेदार कोण असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत .गावातील पाण्याचे व्यवस्थापन करून गावातील घाणीचे साम्राज्य बंद करावे अशी मागणी गावातील नागरिकाकडून होत आहे .