अंबाजोगाई साहित्य संमेलन निमित्ताने व्यक्तिचित्रण लेखन स्पर्धेचे आयोजन.
स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
११ व्या नियोजित अंबाजोगाई साहित्य संमेलन निमित्ताने “व्यक्तिचित्रण लेखन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत नवोदित आणि प्रथितयश लेखकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावे असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार आणि संयोजिका रेखा देशमुख यांनी केले आहे या संदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, नियोजित ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाची तयारी सुरू झाली आहे. या संमेलनाच्या तयारीचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील ही “व्यक्तीचित्र लेखन” स्पर्धा आहे. माणूस समजून घेणे व त्याची ओळख इतरांना करून देण्यासाठी शब्दबद्ध करणे, हे मोठ्या कौशल्याचे काम असते. ते या स्पर्धेतून साधायचे आहे. ही स्पर्धा फक्त अंबाजोगाई करायसाठी आहे. या निमित्ताने आम्ही अंबाजोगाई शहरातील नवोदित आणि प्रथितयश लेखकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार व संयोजिका रेखा देशमुख यांनी केले आहे. या स्पर्धे साठी काही नियम व आटी घालून देण्यात आल्या आहेत. त्या खालील प्रमाणे आहेत. अ) शब्द मर्यादा : किमान 1500 व कमाल 2000. ब) लेखन पाठवण्याची अंतिम तारीख : 30 ऑक्टोबर 24 क) पाठण्याचे ठिकाण : व्हाट्स एप- 9960821249, ई-मेल- [email protected], प्रत्यक्ष लेखन आणून देण्याचे ठिकाण : यशश्री खादी भांडार, नगरपालिका संकुल, आंबाजोगाई.
(या दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता)
1) लेखाच्या शेवटी: ‘प्रस्तुत लेख मी स्वतः लिहिला असून, या लेखाची पूर्ण जबाबदारी माझी आहे’ अशी हमी लिहिणे अनिवार्य आहे.
2) हमी नंतर आपले पूर्ण नाव, पोस्टाचा पिनकोड सह पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर लिहावा.
3) ही खुली स्पर्धा आहे. या स्पर्धेत आंबाजोगाईचा कोणताही व्यक्ती भाग घेऊ शकतो. वयाचे बंधन नाही.
4) ११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीचे सदस्य, स्पर्धेचे परीक्षक या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत.
5) या स्पर्धेला भाषेचे बंधन नाही, मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी वा अन्य भाषेतील लिखाणाचे स्वागत राहील.
6) विजेत्या तीन स्पर्धकांची निवड केली जाईल व ११ व्या आंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या मंचावर प्रत्येकाला स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला जाईल.
7) स्पर्धेत सहभागी झालेली सामुग्री परत दिली जाणार नाही.
8) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
या सर्व नियम व अटी स्पर्धेत सहभाग घेणारांसाठी बंधनकारक असतील.