तलवारीच्या धाकावर धुमाकूळ घालणारा गजाआड
यवतमाळ/ धारदार तलवार हातात घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई येथील आझाद मैदान परिसरातील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ आज दुपारी येथील स्थानिक गुन्हेशाखा पोलीस पथकाने केली. निशांत रामदास वागधरे (१९) रा. बालाजी चौक, भोईपुरा यवतमाळ असे अटकेतील गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला तलवारीसह यवतमाळ शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई एलसीबी पीआय ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात करणयात आली