विशालगड अतिक्रमण मुक्त असा इशारा देत दर्गाह मशीद आणि मुस्लिम घरांवर हल्ले करणाऱ्या समाजकंठकांवर कारवाई करा.
ह. टिपू सुल्तान युवा मंचचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापुरातील विशाळगड आणि मुस्लिम वाडीत झालेल्या भ्याड हल्ल्याचा आज दिनांक 16 जुलै रोजी परभणी शहरात हजरत टिपु सुल्तान युवा मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता असलेली मलिक रेहान बाबा यांची दर्गाह परिसरात मोठ्या प्रमाणात दंगल करुन तसेच मुस्लिम वाडीत आतंक माजवणा-या आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक व्हावी व या मोहिमेला प्रोत्साहन देऊन हिंसक झालेल्या कार्यकत्यांची पाठराखण करणाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे। व CCTV कैमेरा वरून किंवा तपासावरून लवकरात लवकर आरोपीना अटक करण्यात यावी अन्यथा हजरत टिपु सुल्तान युवा मंचाकडून येणाऱ्या काही दिवसात कायदेशीर मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला.
दिलेल्या निवेदनात सय्यद अब्दुल कादर ॲड. आसेफ पटेल, मौलाना रफिउद्दिन अश्रफी, गुलाम मोहम्मद मिठो, मौलाना अब्दुल रहमान पुत्री, नदीम इनामदार, अहमद खान, शेख माजेद, बदर चाऊस, बाबर चाऊस, अब्दुल अलीम, सय्यद रईस आदींसह विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत व असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी