देवांचीआळी अर्थात देवळाली प्रवरा नगरीत अवतरली पंढरी
श्री.छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यां समवेत नागरिक हरीनामात दंग
आषाढी वारी निमित्त सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील अगदी काना कोपऱ्यातून विठ्ठल नामाचा जयघोष वारीतून केला जात आहे.देवळाली प्रवरा येथिल श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी एक विचार करून आपण आपल्या शहरामध्येच आषाढी दिंडी वारी काढण्याचे ठरवले व सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला.विठ्ठल नामाचा जयघोष करीत,ज्ञानबा तुकाराम चा जयघोष करीत देवळाली प्रवरात भक्तिमय वातावरणा निर्माण होवून रिंगण सोहळ्यामुळे अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटली.
अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथिल श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विठ्ठल रुक्माई वेशभूषा साकारली. शाळेच्या मैदानावर पहिला रिंगण सोहळा पार पडला. टाळ वाजे,मृदंग वाजे,वाजे हरीचा विणा,माऊली निघाली पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. त्याच बरोबर ज्ञानबा तुकाराम चा जयघोष करत पावली खेळून बाल वारकऱ्यांनी उपस्थित पालकांची मने जिंकली.देवळाली प्रवरा शहर भक्तिमय वातावरणामध्ये अक्षरशः चिंब झाले.दिंडीत रिंगण सोहळा साजरा केला जातो.त्याच प्रमाणे बाल वारकऱ्यांनी रिंगण सोहळा साजरा करुन अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण सोहळा साजरा केला.हा रिंगण सोहळा पाहुण असे वाटत होते की खरोखर पंढरीची वाट धरली तर नाही ना. रिंगण सोहळ्यात मध्यभागी विठ्ठल रुखमीणीच्या वेशभूषा साकरलेले विद्यार्थी,तर पखवादावर थाप मारणारा चिमुकला विद्यार्थी टाळ मृदुंगाच्या निदनात शिक्षक व विद्यार्थी यांच्या रंगलेली पावली सोहळ्याचे आकर्षन ठरले.हा रिंगण सोहळ्यात आखो देखो सोहळा पाहत असताना जनू काही पंढरीचा विठ्ठल सावळा खरोखर देवळाली प्रवरात अवतरला की काय असा भास होत होता.चिमुकल्यांचा रिंगण सोहळा देवळालीकरांसाठी खास आकर्षक ठरला आहे.चौकाचौकात लहान विद्यार्थ्यां पासुन ते शिक्षका पर्यंत फुगडी खेळण्यात तल्लीन झाल्याने या आषाढी वारीत रंगत आली.
शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी माऊली माऊली असा जयघोष करुन दिंडीची सांगता केली.या दिंडीसाठी प्राचार्य पोपट कडूस,उप प्राचार्य अल्हाट,पर्यवेक्षक राजेंद्र भालेकर,मकरंद रायते यांच्यासह सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.
News Today 24 साठी राजेंद्र उंडे राहुरी