अजिंठ्यामध्ये मोहरम विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ
सिल्लोड – हिंदू- मुस्लिम. एकताचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या मोहरम विसर्जन मिरवणुकीला बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून विसर्जनास प्रारंभ झाला. या हुसेन, या हुसेन अशा घोषणा…परिसरात दाणून सोडले . सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड… अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ झाली. बुराख बीबी, ताजीयांची पंजा सवाऱ्याची मिरवणुक काढण्यात आली.
मिरवणुक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते. इमाम वाड्यातून जोगी झाल्यानंतर इमाम हसन हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. परिसरात ही सवारी खेळविण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी महिला आणि नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सवारीवर फुलांची चादर तसेच नवस चढविण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती. बडे नालसाहब, छोटे नालसाहब, टप्प्याची सवारी, मैलेआली सवारी या सर्व सवाऱ्या गांधी चौक येथून दुपारनंतर मार्गस्थ झाली होती . दरम्यान, गुरुवारी (दि. १६) रात्री पूर्ण स्वाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.सकाळपासून हर गल्ली त शरबत वाटत करण्यात आले मोहरम विसर्जन मिरवणूक बुधवारी सायंकाळी सात वाजता करबला विसर्जन करण्यात आले आहे.
अजिंठ्याचे मोहरम आहे प्रसिद्ध गुजरात इंदोर मध्य प्रदेश दिल्ली मुंबई नागपूर नाशिक जालना बुलढाणा धुळे मालेगाव भोकरदन सिल्लोड – मोहरम बघण्यासाठी अनेक ठिकाणचे लोक येतता विसर्जन च्या दिवशी गावात तोफ गर्दी होते
या मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, उपनिरिक्षक वाघुले, उपनिरिक्षक विकास चौधरी उपनिरिक्षक धम्मदीप काकडे, उपनिरिक्षक गणेश काळे, उपनिरिक्षक मोहमद अली, पो.हे. कॉ. अक्रम पठाण, , निलेश शिरस्कर, विकास लोखंडे, संदीप कोथलकर, भागवत शेळके, राम हडे, यांच्यासह एक आयआरबी तुकडी, ६० होमगार्ड असा सुमारे १५० कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.
NewsToday साठी सिल्लोड प्रतिनिधि शेख नदीम