राज्य सरकारने राबवलेली योजना म्हणजे स्त्री सक्षमीकरणाचे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.आ.बाबासाहेब पाटील
अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ अहमदपुर चाकुर विधान सभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.माता भगिनींसाठी सरकारने महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महिला भगिनींनी लाभ घेण्याचे आवाहन आ. बाबासाहेब पाटील यांनी केले. राज्य सरकारने राबवलेली योजना म्हणजे स्त्री सक्षमीकरणाचे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी लटपटे मॅडम, तहसीलदार शिवाजीराव पालेपाड, पंचायत समिती अहमदपूर गटविकास अधिकारी अमोल कुमार अंदेलवाड, सरपंच सुमित्राबाई एकनाथराव वाहुळे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके, जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव देशमुख, चेअरमन चंद्रकांत गंगथडे, महिला बाल आरोग्य अधिकारी घोडके मॅडम, आशिषजी तोगरे, मंडल अधिकारी अण्णासाहेब नागदरे, तलाठी हंसराज जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. रेचावाडे, विस्तार अधिकारी पटेवाड, ग्रामसेवक आर.जी. कांबळे, अंगणवाडी सुपरवायजर सुलोचाना दंडिमे, विस्तार अधिकारी सुळे, आरोग्य विस्तार अधिकारी एस.बी पवार, केंद्रप्रमुख येलगटे, रफिक शेख, निजाम चाचा शेख, दिलदार शेख, माऊली बोडके, शादुल शेख, ग्रा.प. सदस्य शुभम मुंढे, बाळू पवार, ग्रा.प. सदस्य चंद्रप्रकाश हांगे, अक्षय ठाकूर, देशमुख आसिफ आदींसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला भगिनी उपस्थित होत्या.
News today 24 असलम शेख लातुर,