जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दया अन्यथा गूरा ढोरा सह शेतकरी करणारा तीव्र आंदोलन
जायकवाडी व निम्न दुधना दोन्ही प्रकल्पापासून वंचित असलेल्या गावांना शेतीसाठी पाणी द्या संतप्त शेतकऱ्यांची मागणी ,,,,
परभणी: आज दिनांक 24 जुलै रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की ,परभणी जिल्ह्यातून मानवत आणि परभणी तालुका येथून जायकवाडी चा डावा कालवा जातो,आणि सेलू तालुक्यातून निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा जातो,या दोन्ही कालव्याच्या आतील किमान 70 गावांना शेतीसाठी पाणी पोहचले नाही ,सदरील गावात शेतीसाठी या या दोन्ही प्रकल्पापासून पानी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्याचा विकास होत नाही, जलसंपदा व जलसंधारण विभागाने 5 ऑगस्ट पर्यंत सदरील गावातील शेतकऱ्याने ठोस उपायोजना केल्याचे कळवावे, अन्यथा 9 ऑगस्ट पासून सर्व गावातील वंचित शेतकरी आपल्या गुरा ढोरा सह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील आणि जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत माघार घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे दिलेल्या निवेदनावर रंगनाथ सोळंके,शिवाजीराव बोचरे,आकाश लोहट,आर्जून साबळे,केशवराव सुरवसे,प्रभाकर शिंदे,सुभाष जाधव , अंबादास शेळके, भानुदास शिंदे,माणिक काळे,दामोधर घूले, बाळासाहेब केशवराव अवचार , विठल धोत्रे दिलीपराव काळदाते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी