कळमनुरी चे आमदार संतोष बांगर थेट मुख्यमंत्र्याच्या भेटीला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळमनुरी चे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांनी दिले रोजगार सेवकांचे निवेदन.
हिंगोली जिल्ह्यातील रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने दिले विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे दिले आश्वासन.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांच्या नेतृत्वात रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी निवेदनातील मागण्यांचा सकारात्मक विचार करून लवकरच रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा शब्द यावेळी उपस्थितांना दिला. काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथे केशव अण्णा नाईक यांच्या नियोजनाखाली रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा घेऊन त्यांच्या समस्या मुख्यमंत्री महोदयांकडे मांडणार असल्याचा शब्द रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिला होता त्या शब्दाची पूर्तता आमदार संतोष बांगर यांनी रोजगार सेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांची माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून देत सर्वांच्या समस्या मुख्यमंत्री महोदयांकडे मांडल्या.
यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज टुडे 24
हिंगोली जिल्हा
प्रतिनिधी
परशुराम जाधव