इ पॉस यंत्रणा व सर्वर सुरळीत चालत नसल्याबद्दल…. सिल्लोड तालुका स्वस्त धान्य व केरोसिन परवाना संघटना ने दिले निवेदन.
सिल्लोड तहसीलदार सिल्लोड यन्च्या मार्फत जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी छत्रपती संभाजी नगर यांना इ पॉस यंत्रणा व सर्वर सुरळीत चालत नसल्याबद्दल….
विनम्रपणे निवेदन सादर करण्यात आले ज्या मधे मोठा गाजावाजा करून फोरजी मशनरी व यंत्रणा सुरू केली याबद्दल शासन स्वतःची पाठ थोपटून घेत आहे . स्वतःचे कौतुक किती करून घ्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे विषय निर्माण होतो तो इ पॉस यंत्रणा सुरळीत चालू आहे काय याची काळजी कोणी घ्यायची याबद्दल नियुक्त केलेले तंत्रज्ञ हे सक्षम आहेत काय याची कोणी खात्री देऊ शकेल काय ? असा एक दिवस दाखवा की ज्या दिवशी ई पोस् संदर्भात कोणीही तक्रार दाखल केली नाही सकाळ झाली दुकानदार दुकानात जाऊन बसला व पॉस मशीन ऑन केले व ते विना तक्रार चालू झाले व तास दोन तास सुरळीत चालू आहे असा एक तरी दिवस दाखवा .
मशीन चालू झाले म्हणजे ग्रुप वर मशीन चा फोटो व तक्रार याचा नुसता पाऊस पडतो नवल्याचे वाटते आहे की आपला ग्रुप फक्त तक्रारीसाठी सुरू केला आहे का ? सध्या असे सुरू झाले आहे की एक ना धड भाराभर चिंध्या वरून नुसता वाटप किती झाले याची विचारणा होते पण यंत्रणा सुरळीत चालू नाही याचा कोणी विचारच करत नाही . यामध्ये नुसता वेळ जातो दुकानदार समोर असतो व कार्डधारक लोक दुकानात बसून दुकानासमोर बसून असतात ते काय विचारणा करतात की मशीन कधी चालू होणार त्याला काय उत्तर द्यावे हे दुकानदाराला कळत नाही त्याचा नुसता कोडवाडा होतो कारण कार्ड धारकाच्या रोशाला बिचारा दुकानदार बळी पडतो , शिव्या शाप दुकानदार खातो. वेळप्रसंगी हमरी तुम्ही दुकानदारावर भांडण्याची पाळी येते ह्या होणाऱ्या मनस्तापाला जबाबदार कोण ?
मायबाप शासन प्रशासन यांना विनंती की दुकानदाराची जरा तरी दया माया येऊ द्या व सदरील यंत्रणा सुरळीत कशी चालेल याची काळजी घ्या ही नम्र विनंती चे निवेदन देउन सिल्लोड तालुका रेशन दुकानदार संघटना कडून एक त्रस्त वेदना या निवेदन मध्ये रफीक शेरखान अध्यक्ष
यन्चा सह कार्याध्यक्ष जनार्दन शेजुल ,उपाध्यक्ष राधेश्याम कुलवाल ,मधुकर बरडे ,पंडित पारधे ,सलीम शेख,पंडित गोडसे,अजिस पठान,संजय पाटील सह अनेक दुकानदारा नी मांडली आहेत.