मुस्लिम समाजाच्या वतीने आश्रम शाळेत गुरुपोर्णिमा साजरी
गुरुपोर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे.पावन पविञ हा उत्सव सर्वञ साजरा केला जातो.राहुरी तालुक्यातील वरवंडी येथिल गाडगे महाराज आश्रम शाळेतील अनाथ मुलांसमवेत देवळाली प्रवरा येथिल मुस्लीम समाजाच्या वतीने मिष्टांन्न भोजनाचा अस्वाद घेत गुरुपोर्णिमेचा सर्व धर्म एकच असल्याचा आदर्श असा उत्सव सोहळा उत्साहात पार पडला देवळाली प्रवरा ता.राहुरी येथील ह.शाह दावल मलिक दरगाह असुन येथिल ह.अकिल बाबा पटेल हे व्यवस्थापक असुन,येथिल ख़ादिम कमिटी व मौलाना आझाद सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुपोर्णिमे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुपोर्णिमेचा उत्सव साजरा करताना सर्वधर्म गुरुपोर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी अकिल बाबा पटेल यांनी बोलताना सांगितले की,प्रत्येकाचा धर्म जात वेगळी असली तरी सगळ्यांचा ईश्वर एक आहे.जो सर्वत्र आहे. चराचरा मधे आहे.कोणता ही धर्म सत्य आणी असत्य यावरच निर्माण झाला आहे.प्रत्येकाने धर्मावर प्रेम करतांना त्याचे उपदेश आणी शिकवण जपने गरजेचे आहे. गुरुपोर्णिमे निमित्त आश्रम मधिल सर्व विद्यार्थ्याना मिष्टांन्न भोजन देण्यात आले. यावेळी देवळाली प्रवरा येथिल मुस्लिम पंच कमिटीची स्थापण झाली असुन त्याच्या अध्यक्षपदी अकिल बाबा पटेल यांची तर कोर कमिटीचे अध्यक्षपदी पत्रकार रफिक भाई शेख यांची एक मताने निवड झाली.निवड झालेल्या सर्व सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ख़ादिम कमिटी व व्यवस्थापन कमिटीचे सर्वसदस्यांनी कार्यक्रमास पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमातून सर्वधर्म एकोप्याचा संदेश देणारा गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम ठरला आहे.
News Today 24 साठी राजेंद्र उंडे राहुरी