भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचा उदगीर येथील कार्यक्रम लांबणीवर
भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मंगळवार, ३० जुलै, २०२४ रोजी उदगीर येथील बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार होते. मात्र, माननीय राष्ट्रपती महोदया यांचा पूर्वनियोजित महाराष्ट्र दौरा काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथून कळविण्यात आले आहे. परिणामी उदगीर येथील बुद्ध विहार उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
News today 24 असलम शेख लातुर,