लोहारा येथे मोकाट कुत्र्यांनी घेतला ७ बकऱ्याचा जीव
अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मुजीत रेहमान सलीम पटेल वय ३५ वर्ष यांच्या गोटफाॅर्म मधील मोकाट कुत्र्यांनी घेतला ७ बकऱ्याचा घेतला जीव . मोकाट कुत्र्यांची दहशत.भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असून, मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करीत आहेत. उपाययोजना केलेल्या नाहीतर. आज भटक्या कुत्र्यांचा वावर गावात चौकाचौकात दिसत आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थाच्या मनात भीतीचे वातावरण आहे. आज लोकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोहारा ग्रामपंचायतने यांकडे लक्ष देऊन गावातील मोकाट कुञांचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी लोहारा गावातील सुदन नागरिक करीत आहे.
अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे टुडे न्युज 24