स्नेहल भाकरे यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश….
यवतमाळ…..
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व शिवसेना उबाटा गटाचे दिग्रस विधानसभा सह संपर्कप्रमुख स्नेहल भाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या उबाटा गटामधील कार्यकर्त्यांची होत असलेली घुसमट अनेक दिवसांपासून सुरू होती. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वावर व कार्य तत्पर्तेवर विश्वास ठेवून जिल्हा बँकेचे संचालक व शिवसेना उबाठा गटाचे दिग्रस विधानसभा सह संपर्कप्रमुख स्नेहल भाकरे यांनी मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते व पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांना सन्मान व उचित न्याय मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. पालकमंत्री संजय राठोड यांनी स्नेहल भाकरे व त्यांच्या सहकार यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्या त शिवसेना अधिक मजबूत होईल असे प्रतिपादन केले. आपण पालकमंत्री संजय राठोड यांच्या विकासात्मक कार्याने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे याप्रसंगी स्नेहल भाकरे यांनी सांगितले. शिवसेनेमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रमुख कार्यकर्ते मध्ये बाबाराव राठोड अनिल चव्हाण शेख मुस्ताक नितीन बोकडे तेजस काळे हरिश्चंद्र रूपवणे विठ्ठल राव शिंगारे यादव राठोड दिनेश भोयर प्रफुल सोळंके निरंजन लांजेवार आधी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश होता. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक तथा शिवसेना सह संपर्कप्रमुख राजुदास जाधव मोहन राठोड प्रवीण राठोड प्रशांत मासाळ गजानन पाटील भोकरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राजूदास जाधव यांनी केले.