रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाने राबविले सामाजिक उपक्रम
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. भव्य रक्तदान शिबीर, गुरांना चारा वाटप आणि रूग्णांच्या नातेवाईकांना खिचडी वाटप करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दिनांक २७ जुलै २०२४ रोजी अंबाजोगाई येथे दिवसभर विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. यात सकाळी ७.३० वाजता संघर्षभुमी, अंबाजोगाई येथे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला रिपाइं (ए) च्या मराठवाडा महिला संपर्कप्रमुख अम्रपाली गजशिव, बीड जिल्हा महिला उपाध्यक्षा शेख मदिना, अंबाजोगाई महिला तालुकाध्यक्षा उमा गायकवाड, लातुर महिला तालुकाध्यक्षा आम्रपाली आल्टे, श्रीमती कमलाताई चौधरी, श्रीमती नसरीन शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व बुध्दवंदनेने कार्यकमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांना दीर्घायुष्य लाभावे याकरिता मुंडे पीर आणि ख्वाजा हुसेन दर्गाह येथे रिपाइं (ए) चे बीड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बनसोडे (मामा), परळी तालुकाध्यक्ष बंडू भैय्या शिंदे, परळी तालुका युवक अध्यक्ष शुभम इंगळे यांच्या हस्ते चादर चढवून व पुष्पहार अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. तसेच सकाळी ९.३० वाजता शक्तीपीठ माता श्री.योगेश्वरी देवी मंदिरात रिपाइं (ए) च्या बीड जिल्हा युवा महिला अध्यक्षा अलकाताई साळुंखे यांच्या हस्ते खणा-नारळाने ओटी भरून तर रिपाइं (ए) चे मराठवाडा संपर्कप्रमुख प्रकाश वेदपाठक यांच्या हस्ते देवीची महाआरती करून प्रार्थना करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता आशादत्त गोशाळा, नागझरी परिसर येथे रिपाइं (ए) चे बीड युवक जिल्हाध्यक्ष ॠषीकेश भैय्या शिंदे यांच्या पुढाकाराने मराठवाडा कार्याध्यक्ष बबनभाऊ जंगले आणि मराठवाडा संघटक संजयभाऊ तेलंग यांच्या हस्ते गाईंना चारा आणि पेंड वाटप करण्यात आली. या प्रसंगी गोशाळेचे प्रमुख तथा टायगर ग्रुपचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष उमेशभैय्या पोखरकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी स्वतः हजर राहून मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. त्या करिता रिपाइं (ए) चे मराठवाडा संघटक संजयभाऊ तेलंग यांनी त्यांचे आभार मानले. तर सकाळी ११.३० ते ४.३० या कालावधीत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रूग्णालय, अंबाजोगाई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अंबाजोगाई तालुकाध्यक्ष शेख नासेर, युवक तालुकाध्यक्ष अजय भैय्या आगळे आणि शहराध्यक्ष प्रमोद भैय्या गाडे यांनी पुढाकार घेतला. रक्तदान शिबिरात २१ प्रमुख पदाधिका-यांसह महिला पदाधिकारी व इतर कार्यकर्त्यांनी देखिल मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शनिवार, दिनांक २७ जुलै २०२४ रोजी अंबाजोगाई येथे दिवसभर विविध उपक्रम राबविण्यात आले. सायंकाळी ७.३० वाजता स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रूग्णालय, अंबाजोगाई येथे रूग्णांच्या नातेवाईकांना खिचडी वाटप करण्यात आले. या प्रसंगी रिपाइं (ए) चे मराठवाडा कार्याध्यक्ष बबनभाऊ जंगले, मराठवाडा संपर्कप्रमुख, प्रकाश वेदपाठक, मराठवाडा संघटक संजयभाऊ तेलंग, मराठवाडा महिला संपर्कप्रमुख आम्रपाली गजशिव, बीड जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बनसोडे, बीड जिल्हा महिला उपाध्यक्षा शेख मदिना, बीड जिल्हा युवक अध्यक्ष ॠषीकेश भैय्या शिंदे, बीड जिल्हा महिला युवक अध्यक्षा अलका साळुंखे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष शेख नासेर, परळी तालुकाध्यक्ष बंडभाऊ शिंदे, अंबाजोगाई महिला तालुकाध्यक्षा उमा गायकवाड, परळी युवक तालुका अध्यक्ष शुभम इंगळे, अंबाजोगाई युवक तालुकाध्यक्ष अजय भैय्या आगळे, अंबाजोगाई शहराध्यक्ष प्रमोद गाडे, लातुर महिला तालुकाध्यक्षा अम्रपाली आल्टे, श्रीमती कमलाबाई चौधरी, श्रीमती नसरीन पप्पूवाले, प्रणव वेदपाठक, ऋषिकेश मेश्राम, आदित्य वायंगडे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व उपक्रम राबविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.