Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»कोलकाता पीडित महिला डॉक्टर खून प्रकरणातील नराधमांना फाशी द्यावी पत्रकार संघटनेची मागणी.
    Maharashtra

    कोलकाता पीडित महिला डॉक्टर खून प्रकरणातील नराधमांना फाशी द्यावी पत्रकार संघटनेची मागणी.

    newstoday24By newstoday24August 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोलकाता पीडित महिला डॉक्टर खून प्रकरणातील नराधमांना फाशी द्यावी पत्रकार संघटनेची मागणी.

     

    रिसोड: भारतीय सभ्यता व संस्कृतीला काळिमा फासणारी घटना पश्चिम बंगाल राज्याची राजधानी असलेल्या कोलकाता शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली.एका एकतीस वर्षीय पदवीत्तर शिक्षण घेणाऱ्या शिकाऊ महिला डॉक्टर वर अमानुष लैंगिक अत्याचार करुन तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना एवढी विद्रावक आहे की त्या प्रकरणातील दोषींना कितीही कठोर शिक्षा केली तरी कमीच वाटेल.या काळजाला पीळ देण्याऱ्या घटनेचा श्रमिक पत्रकार संघ रिसोड तालुका व इतर संघटनेच्या पत्रकारांनी एकत्रित येत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. व निवेदणाद्वारे देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्म यांच्याकडे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मार्फत या प्रकरणातील आरोपीना मरेपर्यंत फाशी देण्याची मागणी करण्यात आली.त्यानंतर शोक सभेचे आयोजन करुन महिला डॉक्टर ला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व पुन्हा अशा घटना देशात कुठेही होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.प्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रवि अंभोरे, उपाध्यक्ष राहुल जुमडे, सहसचिव आत्माराम जाधव, कार्याध्यक्ष रणजितसिंग ठाकूर, प्रसिद्धी प्रमुख अजय कानडे, कोषध्यक्ष गोपाल खडसे, संघटक गजानन साळेगावकर, संघटक शेख फय्याज़, सहसंघटक शेख तौसिफ़, तालुका पत्रकार संघांचे गजाननराव खंदारे, काशिनाथजी कोकाटे (केके ), महाराष्ट्ट राज्य पत्रकार संघांचे केशव गरकळ,कैलास महाजन इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

    न्यूज टूडे 24
    प्रतिनिधी,फय्याज़ कुरेशी रिसोड

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleरवळगाव येथे चिंतामणी महादेव यात्रा उत्साहात संपन्न
    Next Article संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठोंबरे ; उपजिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना यांना निवेदन
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.