रवळगाव येथे चिंतामणी महादेव यात्रा उत्साहात संपन्न
_ अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ; माजी मंत्री आ.राम शिंदे यांची उपस्थिती !
कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे चिंतामणी महादेव मंदिर यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. रवळगाव येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी सालाबादप्रमाणे येथील चिंतामणी महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी व शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन येथील यात्रा कमिटी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सप्ताह कालखंडात काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरिकिर्तन व हरि जागर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याची सांगता सोमवारी दि.१९ रोजी काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. यावेळी गायणाचार्य हभप सुनिल पवार महाराज संगमनेरकर यांचे काल्याचे किर्तन झाले. तसेच आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी आवर्जून उपस्थिती दाखवत चिंतामणी महादेव मंदिरात दर्शन घेतले. असता शिंदे यांच्याकडे येथील ग्रामस्थांनी चिंतामणी महादेव मंदिराला क वर्गाचा दर्जा मिळावा अशी मागणी केली. यावेळी चिंतामणी महादेव मंदिर रस्त्यासाठी आ.राम शिंदे यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाल्याने आ.शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, संपत बावडकर, सरपंच तात्यासाहेब खेडकर, हभप मनोहर तात्या रासकर महाराज, पोलिस पाटील सुनिल खेडकर, उपसरपंच ज्ञानदेव खेडकर, देवस्थानचे पुजारी गुरूलिंग, सुभाष आण्णा खेडकर, राजाराम रासकर, लालासाहेब खेडकर, मल्हारी म्हस्के, मोहन खेडकर, सोमनाथ मेटे महाराज, बापू वायाळ, दादा सुर्यवंशी, आप्पा शेळके, राजेंद्र रासकर, रमेश खेडकर, बिभीषण खेडकर, गोकुळ रासकर, सुर्यभान वायाळ, कुंडलिक खेडकर, छगन खेडकर, कैलास शेळके, मधुकर खेडकर, बापू सुर्यवंशी, विशाल गोरे, जावेद शेख, विजय खेडकर, खंडू कांबळे, सुरज खेडकर, अंकुश रासकर, किरण वरवट तसेच गावातील तरूण मंडळाचे सर्व पदाधिकारी व पंचक्रोशीतील भाविक भक्त, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री आमदार राम शिंदे तसेच हभप सुनिल महाराज पवार, हभप मनोहर रासकर, सुनिल खेडकर आदींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
प्रतिनिधी महंमद पठाण सह नयुम पठाण कर्जत