दुग्ध व्यवसायासाठी महिलांना आर्थिक पाठबळ देणार : आ.डॉ.राहुल पाटील
परभणी : निराधार, विधवा महिलांच्या हाताला काम देवून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. महिलांनी तयार केलेल्या कपड्यांना बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यातून महिला आर्थिक सक्षम होत आहेत. मानवत येथील दुध डेअरीच्या माध्यमातून १९ कोटी रुपये दुध उत्पादकांना मिळाले आहेत. या व्यवसायात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी महिलांना दुग्ध व्यवसायासाठी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून भांडवल म्हणून कर्ज उपलब्ध करुन देत माता, भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही आमदार डॉ.राहुल पाटील यांनी महिला स्नेह मेळाव्यात बोलताना दिली.
आ.डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने रक्षाबंधन सणा निमित्त महिलांचा स्नेह मेळावा शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात सोमवार, दि.१९ आॅगस्ट रोजी पार पडला. या मेळाव्यात माँसाहेब मीनाताई ठाकरे विधवा, परितक्त्या स्वावलंबन संकल्प योजनांतर्गत ५०० महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. यावेळी आ.डॉ. राहूल पाटील, डॉ.संप्रिया पाटील, मीराताई रेंगे, डॉ.विवेक नावंदर, शिवसेना महिला आघाडीच्या संघटक अंबिका डहाळे, सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जया बंगाळे, प्रगतशिल शेतकरी मेघा देशमुख, प्राचार्या सरोज देसरडा,डॉ.सालेहा कौसर आदींची उपस्थिती होती.
स्नेह मेळाव्यास परभणी विधानसभा मतदारसंघातील महिला बचतगटाच्या प्रतिनिधी, महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्या, अंगणवाडी सेविका, आशाताई, मदतनीस, आरोग्यसेविका आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी