क्रीडा भारतीचा उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार उत्रेश्वर पांचाळ यांना प्रदान.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) क्रीडा भारती च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार योग शिक्षक उत्रेश्वर पांचाळ यांना प्रदान करण्यात आला . क्रीडा भारती अंबाजोगाई ची बैठक केशवनगर येथील सभागृहात संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रीडा भारती चे पश्चिम क्षेत्र संयोजक मिलींदजी डांगे,तर प्रमुख अतिथी म्हणून देवगिरी प्रांत सहमंत्री राजेंद्र कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डांगे म्हणाले की, क्रीडा भारती ही क्रीडा क्षेत्रात कार्य करणारी मोठी संघटना आहे.शालेय व महाविद्यालयाचे जास्तीत जास्त विद्यार्थी मैदानावर खेळले पाहिजेत.बलोपासनेने शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास होतो हे लक्षात घेऊन विविध क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी सहभागी कसे होतील याकडे लक्ष दिले पाहिजे.शालेय जिवनात क्रीडा शिक्षकांनी खुप महत्वाची भूमिका बजावली पाहिजे असे मत व्यक्त केले. दरम्यान यावेळी सन 2024 चा आदर्श क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार योग शिक्षक उत्रेश्वर पांचाळ गुरुजी यांना प्रदान करण्यात आला.तसेच श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षक सतीश बलुतकर यांना आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा मंत्री विनायकराव वझे यांनी केले.तर आभार प्रदर्शन ज्ञानेश मातेकर यांनी केले.यावेळी सतिश बलुतकर,प्रा.राहुल चव्हाण, शिवकुमार निर्मळे, प्रा.दिलीप कांबळे प्रा.फटांगरे,सौ.मंदाकीनी गित्ते,श्री बोंदर सर,व राज्य पातळीवरील खेळाडू उपस्थित होते.