पुस येथील साळवे परिवाराने रक्षा विसर्जीत न करता वृक्षारोपनाने केले आईंच्या स्मृतीचे जतन.
अंबाजोगाई (वार्ताहर)
तालुक्यातील पुस येथे अनोख्या पध्दतीने वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे यांच्या आईंचे नुकतेच दुःखद निधन झाले. रक्षा सावडण्याच्या दिवशी पारंपरिक प्रथेला थारा न देता पर्यावरणपूरक बाबीला प्राधान्य दिले. रक्षा विसर्जन न करता त्या माध्यमातून आईची स्मृती जागरूक ठेवण्यासाठी स्मशानभूमी परीसरात वृक्षारोपाची लागवड केली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. ग्रामीण भागामध्ये मृत्यूनंतर मृतदेहाला भडाग्नी दिल्यानंतर उर्वरीत अस्थी आणि रक्षा विसर्जनासाठी त्या-त्या धर्मातील परंपरेनूसार विधी करण्याची, एखाद्या तीर्थस्थळावर जाण्याची नातलगांची भावना असते. तालुक्यातील पुस येथे साळवे कुटुंबियांनी जलप्रदुषणाची समस्या लक्षात घेऊन पारंपरिक प्रथेला फाटा देत आईच्या मृत्यूनंतर रक्षा विसर्जन न करता याच राखेचा उपयोग करून स्मशानभूमी परीसरात एक वृक्षरोप लागवड करून रक्षा विसर्जित करण्यात आली. यानिमित्ताने आपल्या मायमाऊलीची आठवण कायम स्मरणात राहील हा उद्देश समाजासमोर ठेवून एक चांगल्या प्रकारचा आदर्श उभा केला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे यांच्या आई सुबाबाई पंढरीनाथ साळवे यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी पुस येथे सोमवार, दिनांक २६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. सुबाबाई यांच्या पार्थिवावर पुस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. साळवे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखद प्रसंगाची माहिती कळताच राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरून संजय साळवे यांचे सांत्वन केले. तसेच ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा, माजी आ.संजय दौंड, माजी आमदार पृथ्विराज साठे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड.राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजेसाहेब औताडे, कृषीमंत्री यांचे स्वीय सहायक खंडू गोरे, रणजित लोमटे, भिमसेन लोमटे, अजित गरड, पुणे येथील कौटुंबिक स्नेही ऍड.धैर्यशील बांदल, नांदुरकर साहेब, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे लातूर विभागाचे अध्यक्ष बालासाहेब सोनवणे, बप्पाजी कदम, प्रा.मधुकर शिनगारे, हाजी मेहमूद दादामियाॅं, शेतकरी कामगार पक्षाचे रजा आवेज, समाजसेवक शेख मुक्तार, उमेश जोगदंड, अमर जोगदंड, धाडस ग्रुपचे अध्यक्ष अतिकांत कांबळे, निलेश शेवाळे, राजेश कोकाटे, विशाल सोनटक्के, पत्रकार जगन सरवदे, अ.र.पटेल, माजी नगरसेवक संतोष शिनगारे, पत्रकार दादासाहेब कसबे, पुसचे सरपंच श्रीराम पवार, मुन्ना वेडे, माऊली वैद्य, सुनिल गौरशेटे, माजी सरपंच वसंतराव देशमुख, बाळू हाके, सोमनाथ उदार, समाधान उदार, बापू उदार, माजी सरपंच राजाभाऊ उदार, अकबर भाई, कारवा, बाबा सय्यद, गुडू भाई, हाजी भाई, असलम भाई, अंबाजोगाई हमाल मापाडी युनियनचे अध्यक्ष बालासाहेब आदमाने, बाळासाहेब देशमुख, बंटी उदार, अमोल पौळे, गौतम साळवे, काशीनाथ साळवे, बाबुराव साळवे, नामदेव साळवे, लाला साळवे, आदेश साळवे, विशाल साळवे, सुनिल धिमधिमे, लक्ष्मण गायकवाड, कल्याण उदार, रमेश वाघमारे, पिंन्टू साळवे यांच्यासह वकील, डॉक्टर, शिक्षक बांधव आणि कर्मचारी संघटना तसेच पुस गावातील सर्व गावकऱ्यांसह, अंबाजोगाई, परळी पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेते, कर्मचारी वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी लोकभावना व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे यांनी सांगितले की, आमची आई ही वडीलांप्रमाणेच शब्दाला जागणारी होती. योगायोग असा की, २०१६ साली वडीलांचे व आता २०२४ साली आईचे निधन झाले त्या दिवशी गोकुळाष्टमी होती. दोघेही शंभर वर्षांहून अधिकचे आयुष्य जगले. आईचा आज रक्षा सावडण्याचा विधी होता. याप्रसंगी पर्यावरण संवर्धनासाठी स्मशानभूमी येथे एक वृक्ष लागवड करून रक्षा विसर्जित करण्यात आली. या दोन दिवसांच्या काळात आमच्या आई-वडिलांनी आयुष्य जगत असताना कमावलेली माणसं मोठ्या संख्येने अंतिम विधीसाठी आणि रक्षा विसर्जित विधीसाठी हजर होऊन तसेच फोन करून आणि सोशल मीडियावरून आमच्या परिवाराचे सांत्वना करीत होती. यामुळे आमच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळते आहे. माझ्या आई-वडिलांनी त्यांच्या हयातीत कमावलेली माणसं हीच आमची खरी श्रीमंती असल्याचे आम्हाला दाखवून दिले आहे. यावेळी उपस्थित अनेक ज्येष्ठांनी १९७२ च्या दुष्काळात आमच्या घरी जनता दरबार भरायचा आणि गावच्या अडचणी सोडविल्या जायच्या हे सांगितल्यानंतर आम्हाला आमच्या आई-वडिलांचा अभिमान वाटला. तशा कठीण प्रसंगात गांव सांभाळून गावातील पाटील, देशमुख यांना मायबाप समजून जहांगीरदार परिवार व लिंगायत समाजासोबत त्यांनी राजकीय दोन पिढ्यांची हयात घालवली. आम्हा सहा लेकरांना अतिशय सुखाने जगवलं हा आमचा अभिमान आहे. येणाऱ्या काळात आम्ही आई-वडिलांची ही माणसं कमावण्याची शिदोरी व वारसा प्रामाणिकपणाने सांभाळू, आमच्या दु:खात सहभागी झालेल्या सर्व क्षेत्रातील सन्माननीय मान्यवर, मित्र परिवार, स्नेहीजण, नातेवाईक, आप्तेष्ट यांचे परिवाराच्या वतीने आभार मानतो असे संजय साळवे यांनी सांगितले.