नातेपुते-बारामती वाहतूक बंद; नागरिकांना सावधानतेचा इशारा
नातेपुतेः निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. निरा देवघर धरणातून ७५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे, तर भाटघर धरणातून २२ हजार ७३१ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. गुंजवणी धरणातून २५० क्यूसेक विसर्ग सुरू असून शुक्रवारीच निरा नदीवरील वीर धरण १०० टक्के भरल्याने ६३ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले – होते. निरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे वीर धरण क्षेत्रातील निरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वीर धरणातून ५५ हजार २७३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे सातारा आणि पुणे या दोन्हींच्या सीमेवर असलेल्या वालचंदनगर, बारामती या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे या पुलावरील वीर धरण १०० टक्के भरले असून नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क रहावे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीतील पंप अथवा तत्सम साहित्य, जनावरे असल्यास तत्काळ तेथून हलवाव्यात, तसेच लोकांनी काळजी घ्यावी.
-अमोल मस्कर,
उपविभागीय अभियंता,
पुलावरून पाणी जात असल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सुरक्षेच्या कारणावरून वाहतुकीस रस्ता बंद करण्यात आला असून वालचंदनगर, बारामतीकडे, जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. महारुद्र परजणे, सपोनि, नातेपुते पोलिस ठाणे वाहतूक बंद करण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातील देशमुखवाडीपासून ते संगमपर्यंतचे बंधारे पाण्याखाली गेले असून माळशिरस तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोलमडली आहे.