सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथील विद्यार्थ्यांची मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याशी सुसंवाद
स्थानिक डोंगर खंडाळा येथील श्रीमती वसंतीबाई देवकिसनजी चांडक सहकार विद्या मंदिर डोंगर खंडाळा येथील वर्ग 8वी ते 10वी च्या विद्यार्थिनी यांनी सन्माननीय भाईजी यांच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक क्षेत्र भेट या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे भेट दिली व सुसंवाद साधला. व या भेटी दरम्यान माननीय जिल्हाधिकारी श्री किरण पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांशी विविध विषयावर चर्चा करून अमूल्य असे मार्गदर्शन केले जर आवडीनुसार व्यवसाय निवडाल तर यश हमखास मिळते हा मूलमंत्र पाटील साहेबांनी दिला.या शिवाय जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्राविषयी ची संपूर्ण आणि अद्यावत महिती घ्या.क्रीडा, कला, आरोग्य, साहित्य, समाजसेवा, प्रत्येक क्षेत्राचे विशेष असे महत्त्व आहे, आणि प्रत्येक क्षेत्रातून व्यक्तीने प्रगती करावयास हवी, आणि निकोप व प्रगतशील समाज घडविण्यासाठी हातभार लावावा. विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाबद्दल विचारून, त्यांना त्यांच्या स्वप्न पूर्ती काय केलं पाहिजे याबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले.मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री रोढे सर यांनी केले. यावेळी माननीय श्री कुलदीप जंगम साहेब जिल्हा परिषद बुलढाणा यांची मुख्य उपस्थिती होती तसेच श्री केतन गीते सर , हर्षा पोलाखरे मॅडम संध्या काळे ,श्री नितीन घुले, श्री प्रशांत काकडे व विद्यार्थिनी कु अमृता जेऊघाले ,अनुष्का जेऊघाले, भक्ती धंदर,साक्षी दळवी ,सिद्धी अडाळकर इ. उपस्थित होत्या.
न्यूज टुडे 24 साठी
गणेश काकडे
बुलढाणा