राष्ट्रवादी दिव्यांग आघाडी मध्ये पदाधिकारी यांच्या नियुक्त्या आणि जाहीर प्रवेश
राष्ट्रवादी दिव्यांग आघाडी च्या विविध पदावरती पदाधिकारी यांच्या नियुक्त्या.
परभणी: जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग आघाडी ची बैठक एका खाजगी हॉटेल मध्ये दिव्यांग आघाडी चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गंधारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाली या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून उपाध्यक्ष जलील पठाण, शहर अध्यक्ष गजानन दुधारे,विशाल बनसोडे उपस्थीती होते. यावेळी उपस्थीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातत्याने दिव्यांग बांधवांच्या प्रश्नावर आवाज उठवत असते, दिव्यांगांच्या अडचणी सोडवून शासन दरबारी न्याय मिळवून देणे असो किंवा योजना चा लाभ मिळवून देणे असो असे महत्वाचे काम पक्ष करत असतो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिक भक्कम व्हावी पक्ष संघटन मजबूत झाले पाहिजे म्हणून आज काही महत्वाच्या पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत यात गंगाखेड तालुका आधक्ष पदी भागवत मुळगिर ,सोनपेठ तालुका अध्यक्षपदी स्वामी मालजंगम ,तर उपाध्यक्षपदी तातेराव गरड, यांची नियुक्ती करण्यात आली तर यावेळी शितल साठे ,दत्ता शिंदे ,गोपाळ सिपले, विनायक भिसे गजानन ईटकर,इंदर्जित मोहिते तुळशीराम विटेकर यांनी जाहीर प्रवेश घेतला आहे.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी