व्यापारी एवं उद्योजक संघ हिंगणघाटच्या वतीने झालेला सत्कार हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण
मोहसिन खान
– आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या व्यापारी एवं उद्योजक संघ व्यापारी एवं उद्योजक संघ हिंगणघाटच्या यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम स्थानिक कटारिया भवन येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी हिंगणघाट व्यापारी संघाच्या विविध व्यापारी व औद्योगिक उद्योगपतीनी आमदार कुणावार यांचे अभिनंदन करत स्वागत केले यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार कुणावार यांनी हा पुरस्कार माझा नसून आपल्या मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेचा असून यामध्ये तुमचा पण बहुमूल्य वाटा असल्याची व या सत्कारामुळे नव्या जोमाने काम करण्याची उर्जा मिळेल अशी भावना व्यक्त केली यावेळी सुप्रसिद्ध उद्योगपती श्री.जगदीशजी मिहानी, श्री.राजेंन्द्रजी राठी यांनी आमदार कुणावार यांच्या राजकीय व सामाजिक जिवनावर प्रकाश टाकत गौरव केला याप्रसंगी मंचावर विदर्भातील सुप्रसिद्ध उद्योगपती श्री.वसंतजी मोहता, श्री.ओमजी डालिया, श्री.अशोकजी राजपूत, श्री. डॉ.मधूसुधन गोयंका उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यापारी व औद्योगिक संघाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.