शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये लोकसेवा विद्यामंदिरचे मंद्रूप विजयी सलामी.
जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर व पंचायत समिती दक्षिण सोलापूर वसुंधरा महाविद्यालय सोलापूर या मैदानावर. 12 सप्टेंबर2024 रोजी घेण्यात आलेल्या दक्षिण सोलापूर शालेय तालुकास्तरीय १९ वर्ष खालील खो खो क्रीडा स्पर्धेत लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रूप विरुद्ध महात्मा फुले मंद्रूप या अटीतटीच्या अतिंम सामन्यामध्ये महात्मा फुले संघाचा 1 डाव 22 गुणांनी पराभव करून लोकसेवा विद्यामंदिर मंद्रूपच्या खेळाडूने घवघवीत हे संपादन केले आहे .व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आले तर सर्व यशस्वी खेळाडूंना श्रीधर टेळे , नागनाथ धनाळे ,विश्वनाथ घाटे ,शिवपुत्र म्हेत्रे, प्रशिक्षक अविनाश कोळी, व आदींनी मार्गदर्शन केले.तर लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार शिवशरण पाटील ,सचिव गुरुसिध्द म्हेत्रे ,सहसचिव पिरप्पा म्हेत्रे मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर, पर्यवेक्षक मदगोंडा मलकरी यांनी अभिनंदन केले .व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी शिवराज मुगळे सोलापूर