शेतवस्तीवर दरोडा, वृद्ध दाम्पत्याला मारहाण पन्नास हजारांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार, सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा येथील घटना.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील व सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा शिवारातील शेतवस्तीवर दरोडा टाकून तीन ते चार दरोडेखोरांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह ५० हजारांचा मुद्देमाल लुटला. घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बुधवारी रात्री ९:१५ वाजता फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्याला वैद्यकीय उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. गंगादेवी नाईक-चव्हाण व वामनराव नाईक-चव्हाण (रा. घाणेगाव तांडा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) असे दरोडेखोरांच्या माराहाणीत जखमी झालेल्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगादेवी नाईक चव्हाण व वामनराव नाईक चव्हाण हे वृद्ध दाम्पत्य घाणेगाव तांडा शिवारातील शेतवस्तीवरील घरात मागील अनेक वर्षांपासून राहतात, मंगळवारी दिवसभर त्यांनी शेतीची कामे केली. कामे उरकल्या नंतर नेहमीप्रमाणे जेवण करून रात्री ९ वाजेच्या सुमारास ते शेत वस्तीवरील घरात झोपी गेले. रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या पाठीमागील खोलीचा दरवाजा कोणीतरी जोराजोरात ठोकत असल्याचे ऐकू आल्याने ते दोघेही घराच्यापाठीमागील खोलीत गेले असता पाठीमागचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसले. त्याच सुमारास तीन ते चार अज्ञात दरोडेखोरांनी अचानक घरात प्रवेश करून हातातील हत्याराने वामनराव यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यांच्याकडून घरातील कपाटाची चाबी हिसकावून घेतली. गंगादेवी व वामनराव यांना मारहान करून त्यांचे हातपाय बांधले व त्यांना वेगवेगळ्या खोलीत डांबून ठेवले. ३५ हजार रुपये हिं ५ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व १५ हजार रुपये किमतीच्या १० भार चांदीच्यापट्या असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल घेऊन दरोडखोर पसार झाले.
Today news 24 साठी बहादुर चव्हान सोयगाव