अज्ञात तापेने घेतला तेरा वर्षीय शाळकरी चिमुकलीचा बळी.पिंपळगाव रेणुकाई येथील महिनाभरातील दुसरी घटना या गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्य आरोग्य विभाग प्रशासनावर ही ऊपाय योजनेच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
जालना जिल्ह्यामधील भोकरदन तालुक्यातील असलेले पिंपळगाव रेणुकाई येथील एका तेरा वर्षीय सातवी वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीचा अज्ञात तापेने बळी घेतला असल्याची घटना घडली आहे.सदर घटनेत मृत झालेल्या चिमुकलीचे नाव दिपाली बालाजी कड वय (१३) वर्ष असे असुन ती गावातील जिल्हा परिषद शाळेतील आहे.मागील महिन्यात देखील एका कुटुंबातील सतरा वर्षीय मुलीचा अशाच प्रकारे मृत्यू झाल्याची घटना घडली होती.त्यात पुन्हा ही घटना घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाआरोग्य विभाग नेमकं ऊपाय सोडून करतंय तरी काय? हा प्रश्न पडत आहे. तापेने महिनाभरातच दोन जणांचा मुलीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वैक्षण करणे गरजेचे आहे.शिवाय गावात अनेक भागात घाण पाण्याचे डबके साचले आहे. मच्छंराचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे.याचा परिणाम आरोग्यावर होत आहे.ग्रामपंचायतीने देखील स्वच्छता मोहीम हाती घेणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
News today 24 हुन अनिल जाधव जालना