विद्यार्थ्यांनी देश सेवेसाठी तत्पर असावे – डॉ. दयानंद गुडेवार
घोणसी : उज्वल ग्रामीण महाविद्यालय, घोणसी ता. जळकोटच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस निमित्ताने बोलत असताना डॉ.दयानंद गुडेवार यांनी, “विद्यार्थ्यांनी देश सेवेसाठी नेहमी तत्पर राहावे.” असे आव्हान केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, माजी विभागीय समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड डॉ.दयानंद गुडेवार यांनी असे सांगितले की, “राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारच्या शिक्षण युवा कल्याण व क्रीडा मंत्रालया अंतर्गत कार्य करीत असते. महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांनी देशाची सेवा करावी. तसेच, ग्रामीण भागातील समाज जीवन व त्यांच्या अडचणी जवळून पाहून त्यावर उपाययोजना कराव्यात. या उदात्त हेतूने 24 सप्टेंबर 1969 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने याची सुरुवात करण्यात आली होती.
याप्रसंगी डॉ. वनमाला लोंढे, कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय तोंडारकर, डॉ. सचिन घुगे, डॉ. नाथराव मोरे डॉ संगीता उप्पे, डॉ.पद्माकर गोने व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.