कडाची वाडी येथे कंटेनरच्या चाकाखाली दुचाकीस्वार ठार
चाकण शिक्रापूर रस्त्यावरील HP प्रेटोल पंपासमोर भरधाव चाललेल्या कंटेनरने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार हेमंत महाजन वय 18 वर्ष हा या अपघातात मृत्युमुखी पडला असुन कंटेनर चालक फरार झाला आहे.दुचाकी वरील तरुण आपल्या दुचाकीवरून mh 14 gw 6803 चाकणच्या दिशेने जात असताना शिक्रापूरकडे भरधाव वेगाने चाललेल्या mh46 bf 0897 कंटेनरने ओव्हरटेक करत असताना त्याला धडक दिली.कंटेनरचे चाक अंगावरून गेल्याने हेमंत गंभीर जखमी झाला. पोलिसांना अपघाताची माहीती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्याला चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास चाकण पोलीस करत आहे.