Omkar satpute | नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका माता देवस्थान मंदिरात ओंकार सातपुते यांच्या हस्ते घटस्थापना
केडगाव देवी भाविकांचे श्रद्धास्थान – ओंकार सातपुते
नगर : केडगाव देवी मंदिराला धार्मिकतेचा मोठा वारसा असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे, नवरात्र उत्सवामध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येने भावीक वर्ग दर्शनासाठी येत असतात, केडगाव ग्रामस्थ व देवस्थानच्या वतीने भाविकांची दर्शनाची सोय केली जाते, नगर शहरांमधून मोठ्या संख्येने महिला भगिनी वर्ग दर्शनासाठी येत असतात त्यांच्या सुरक्षेतेची काळजी या ठिकाणी घेतली जात आहे, श्री रेणुका माता मंदिरात घटस्थापनेचा मान सातपुते कुटुंबाला मिळाला असून याबद्दल देवस्थानचे आभार मानतो व देवीचरणी प्रार्थना करतो की सर्व नागरिकांना सुख समृद्धी व आनंददायी जीवन जगण्यासाठी शक्ती देवो व समाजाप्रती चांगली सेवा करण्याची संधी देवो अशी अपेक्षा ओंकार दिलीप सातपुते यांनी व्यक्त केली.
नवरात्र उत्सवानिमित्त केडगाव येथील श्री रेणुका माता देवस्थान मंदिरात ओंकार दिलीप सातपुते यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली यावेळी पत्नी धनश्री सातपुते, दिलीप सातपुते, भाविक भक्त व पुजारी उपस्थित होते