Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Blog»Sangram jagtap | अहमदनगर : सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार
    Blog

    Sangram jagtap | अहमदनगर : सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार

    newstoday24By newstoday24October 3, 2024No Comments4 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : सीना नदी, भिंगार नाल्याचे भाग्य उजाळणार

    आमदार जगताप यांच्या प्रार्थनेला नवरात्रात देवी पावली; खोलीकरण व रुंदीकरणासाठी 20 कोटी मंजूर

    अहमदनगर –
    जास्त पाऊस पडला की पूर येऊन नगर शहरातील नदीच्या आजूबाजूच्या सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरणे हे दरवषच्या पावसाळ्यात नियम झालेल्या सीना नदीला आता पाणी पोटात साठवून ठेवण्याचे भाग्य लाभणार आहे. तसेच भिंगार नाल्याचाही चेहरा उजाळणार आहे. सीना नदीच्या पूररेषेची फेरआखणी करण्याची आमदार संग्राम जगताप यांची मागणी रुंदीकरण व खोलीकरण केल्याशिवाय करता येत नव्हती. तेव्हा आमदार जगताप यांनी त्यासाठी लागणाऱ्या निधीकरिता पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्याला यश येऊन राज्या शासनाच्या 15 व्या वित्त आयोगातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसे पत्र अहमदनगर महापालिकेला ऐन नवरात्रीच्या प्रारंभीच प्राप्त झाले आहे.

    नगर शहराच्या सीमेला लागून सीना नदी वाहते. नगर शहराभोवती तिची लांबी सुमारे 14 किलोमीटर आहे. परंतु सीना नदीच्या काठाने मानवी वस्त्या वाढत गेल्या तसेच नदीकाठच्या जमीनधारकांनी अतिक्रमणही केले आणि नदीचे पात्र आकसत गेले. त्यातून नदीला एखाद्या ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. सीना नदीला पूर येणे हे तशी औत्सुक्याची बाब. एक तर नगर जिल्ह्यात एखाद्या वषच पावसाची कृपा असते. नेहमी अवर्षणच असते. कधी तरी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला की सीना नदीला पूर येतो. पाऊस जास्त झाला की आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते व तेथील रहिवाशांची त्रेधातिरपीट उडते. यंदाच्या पावसाळ्यातही तशी परिस्थिती उद्भवली होती. वारंवार होणारी ही स्थिती व नागरिकांचे हाल टाळण्यासाठी सीना नदीची पूररेषा आखून नियोजन करणे आवश्यक होते. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी नगर महापालिका व जिल्हाधिकारी यांच्यासह 2023 मध्ये संयुक्त बैठक घेतली होती. त्या बैठकीत सांगोपांग चर्चाही झाली. आमदार जगताप यांनी महसूल व वनविभागाच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाब कैफीयत मांडली. या विभागाने राज्याच्या जलसंपदा विभागाकडे याबाबत मत मागविले होते. जलसंपदा विभागाने पूररेषेची फेरआखणी करण्यासाठी काय करावे लागणार याबाबत सूचना केल्या. सीना नदीचे रुंदीकरण व खोलीकरण अगोदर करायला हवे तरच पूररेषेची आखणी करता येईल असे या विभागाने सांगितले. या नदीवर शहर व शहराजवळ असलेल्या पुलांच्या लांबीरुंदीचे गणितही पाहणे गरजेचे आहे.

    सीना नदीची मूळ वहनक्षमता पुनर्स्थापित करावयाची असल्यास नदीपात्रात साचलेला गाळ काढणे, अतिक्रमण काढणे, गरजेचे आहे. काढलेला गाळ नदीकिनारी टाकून नगर शहराचे सुशोभिकरण करता येईल असे महापालिकेने म्हटले होते. त्यावरून किनारी रस्ता (कोस्टल रोड) तयार करता येऊ शकतो. त्यातून नदीचे मूळ पात्र पुनर्स्थापित होऊन त्या पात्रात पाऊस व अन्य पाण्याचा विसर्ग किती बसू शकतो ही लक्षात येईल. त्यासाठी महापालिकेच्या हद्दीतील 10 किलोमीटर लांब नदीचे खोलीकरण व रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे महापालिकेने म्हटले होते. तशी शहराभोवतालची नदीची लांबी 14 किलोमीटर आहे. या भागात तिची प्रस्तावित रुंदी 20 ते 30 मीटर व प्रस्तावित खोली चार मीटर आहे. पूव 09.70 किलोमीटर लांबीचे काम झाले असले तरी उर्वरीत पुरे करावयाचे आहे.

    नदीचे रुंदीकरण व खोलीकरणासंदर्भात प्रकल्प मूल्यमापन समिती, राज्य कार्यकारी समिती, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, तांत्रिक मूल्यमापन समिती यांच्या बैठका झाल्या. दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना आदींचा विचार करून 15व्या वित्त आयोगामार्फ आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन योजनेअंतर्गत सीना नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच भिंगार नाल्याचेही खोलीकरण व रुंदीकरण या कामांसाठी 20 कोटी 66 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सीना नदी व भिंगार नाल्याचे भाग्य त्यामुळे उजाळणार आहे.

    नगरमध्ये विकास कामांचा महासंग्राम
    कोरोना काळात नगर शहरातील विकास कामे काही प्रमाणात थांबली होती. परंतु, त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नगर शहरात विविध कामांसाठी भरीव निधी आणला. या निधीतून वाडिया पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरातील रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. उद्यानांसाठी सहा कोटींचा निधी मिळाल्यामुुळे शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे. तसेच सीना नदी, भिंगारनाला सुशोभिकरणासाठी 20 कोटींचा निधी मिळाल्याने नगर शहराचे रुपडे बदलणार असल्याचे दिसून येत आहे.

    सीना नदी अतिक्रमणमुक्त होणार
    सीना नदी पात्रातील अतिक्रमण व गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी नागरी वसाहतींमध्ये शिरते. यंदाही पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरलेे. पुराच्या पाण्याची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणीही केली होती. पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याची आ. जगताप यांनी गांभीर्याने दखल घेत सीना नदी सुशोभिकरण व अतिक्रमण मुक्त, रुंदीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. याबाबत आ. जगताप तीन वर्षांपासून प्रयत्नशील होते. सीना नदीतील गाळ व अतिक्रमणे काढल्यास पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय मार्गी
    नागपूर, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, नालेगाव, ठागणे मळा, काटवण खंडोबा रोड, स्टेशन भाग, पुणे महामार्ग, फुलसौंदर मळा, बाबर मळा या भागात पूर नियंत्रण रेषेचा विषय माग लागत नव्हता. परंतु, आमदार संग्राम जगताप यांच्या अथक प्रयत्नानंतर सीना नदी लगत असलेल्या पूर नियंत्रण निळ्या व लाल रेषेचा विषय माग लागला आहे. त्यामुळे जागा मालकांना आता जागा डेव्हलप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous ArticleOmkar satpute | अहमदनगर : केडगाव देवी मंदिरात यंदा पहिल्यांदाच सातपुते कुटुंबाला घटस्थापनेचा मान , चर्चेला उधाण
    Next Article Shivajirao kardile | विजय संकल्प सभेने शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराची सांगता, सभेला तुफान गर्दी
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.