राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराची सांगता विजय संकल्प सभेने झाली
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या प्रमुख उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मतासाठी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही आता महाराष्ट्रात वोट जहाज चेराजकारण सुरू झाले असून त्याला विरोध करण्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी मतदानाचा हक्क बजावावा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे कामाचा माणूस असून त्यांनी नेहमीच वारकरी संप्रदाय ला मदत केली आहे शासनाच्या विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आव्हान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.
यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर, उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाऊसाहेब करपे, ह भ प विश्वनाथ महाराज राऊत, अक्षय कर्डिले, धनराज गाडे, राजू शेटे, विलास साळवे, संभाजी पालवे, अण्णासाहेब बाचकर, सुरेश वाडकर, उदयसिंह पाटील आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : मी लोकसभा निवडणुकीला पडलो असून राहुरीकरांना माझ्या परावाचे दुःख झाले असेल त्यांनी भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मतदान करून वचपा काढण्याचे ही एक संधी आहे विखे पाटील परिवारावर प्रेम केलं आहे जे लोक विखे पाटलाचे नाव सांगून तनपुरेच्या स्टेजवर जातात त्यांना कधीही घरामध्ये घेतले जाणार नाही माझ्या परवाचा व आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वाचवा काढण्यासाठी कर्डिले यांना विजयी करावे या माणसाने तुमच्यासाठी रात्रंदिवस एक केलं त्यांच्या कष्टाचे चीज झालेच पाहिजे यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी करा असे आव्हान माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मोबाईलद्वारे जनतेला केले.
चौकट एक मुलगा जन्मापासून आजपर्यंत एक गोष्ट पाहतोय की कधीही कुटुंबाला वेळ दिला नाही मी शाळेत असताना सर्व मित्रांचे आई-वडील शाळेत यायचे मात्र माझे वडील कधीही माझ्याबरोबर आले नाहीत आज मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले ही जनता पाहून साहेब 28 वर्षे काय करत होते त्यांनी नेहमीच जनतेच्या सुखदुःखाकडे प्राधान्य दिले आपल्या कुटुंबाचा वेळ जनतेला दिला जो माणूस स्वतःच्या जीवाची परवा न करता जनतेसाठी काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे आता त्यांची वेळ आली असून आता जनता त्यांच्याबरोबर राहील असे भावनिक वक्तव्य युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.
यावेळी उपस्थित जनसागर पाहून अक्षय कर्डिले यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले