नगर तालुका महाविकास आघाडीला जोरदार धक्का
दादा पाटलांचा नातू अंकुश शेळके यांचा भाजपात प्रवेश
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना मोठे यश
नगर – नगर तालुक्यातील महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. कै.माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे नातू व रावसाहेब शेळके यांचे चिरंजीव अंकुश शेळके यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच झटका बसला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची खेळी यशस्वी झाली असून महाविकास आघाडीला घरघर लागल्याचे दिसते.